Agriculture news in marathi Plant pomegranates on three hundred hectares in Attapadi | Agrowon

आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब बागा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

या वर्षी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ३०० हेक्‍टर क्षेत्राला मंजुरी दिली आहे. तसेच अन्यही इच्छुक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी प्रस्ताव सादर करावेत. 
- राहुल जितकर, तालुका कृषी अधिकारी, आटपाडी

आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आटपाडी तालुक्‍यात नवीन डाळिंब लागवडीसाठी या वर्षी ३०० हेक्‍टर क्षेत्राला कृषी विभागाने मंजुरी दिली आहे. ‘टेंभूचे पाणी आल्यामुळे तालुक्‍यात डाळिंब व द्राक्ष लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे. 

आटपाडी तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असते आणि हवामान पूर्ण कोरडे असते. कोरड्या हवामानात आणि कमी पाण्यात अत्यंत दर्जेदार डाळिंब येतात. आजपर्यंत तालुक्‍यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड झाली आहे. 

तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मुख्य आणि हमखास पैसे देणारे पीक म्हणून डाळिंब बनले आहे. यापूर्वी विविध योजनांतून डाळिंबाची लागवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना आणली. यामधून डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ यांसारख्या फळपिकांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते. डाळिंब लागवडीसाठी हेक्‍टरी एक लाख सात हजार रुपये अनुदान दिले जाते. 

पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी तीस आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के असे तीन वर्षांत अनुदान विभागून दिले जाते. तालुक्‍यात या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात २७० हेक्‍टर आणि दुसऱ्या टप्प्यात नुकतेच ३४ हेक्‍टरला कृषी विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या वर्षी ३०० हेक्‍टर क्षेत्रावर नवीन डाळिंब लागवडीची भर पडणार आहे. याशिवाय इच्छुक शेतकऱ्यांनी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून डाळिंब लागवड करण्यासाठी प्रस्ताव द्यावेत, असे आव्हान तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांनी केले आहे. 

‘रोहयो‘तूनही डाळिंब लागवडीला मान्यता द्यावी 

दोन हेक्‍टर क्षेत्रावरील डाळिंब लागवडीसाठी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मान्यता दिली जाते. तर आतील क्षेत्रातील शेतकरी रोहयोतून डाळिंबासाठी मंजुरी दिली जात होती. पण, या वर्षीपासून रोहयो पूर्ण बंद ठेवली आहे. अल्प, मध्यम आणि पाच एकरांवरील सर्व शेतकऱ्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मधून फळबाग लागवडीसाठी मंजुरी देणे सुरू केले आहे. तसे न करता अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोहयोतून डाळिंब लागवडीसाठी मंजुरी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे...बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या...
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः...जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन...
धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार...कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने...
कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाककुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे...
द्राक्ष निर्यातवाढीसाठी शासन सहकार्य...अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही...
कपाशी पिकातील फरदड घेणे टाळा : डॉ. पवारअंबड, जि. जालना : ‘‘मराठवाड्यात कपाशीच्या...
मेथी उत्पादनाचा खर्च ४४०० आणि मिळाले...येवला  : महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना...
कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा करा; `...नाशिक : ‘‘रात्रीच्या वेळी पाणी देताना होणारी...
सांगलीत जनावरांचे ई-टॅगिंग रखडणारसांगली (प्रतिनिधी) : तासगाव तालुक्‍यातील तब्बल...
नांदेड जिल्ह्यात सुरळीत विजेअभावी...नांदेड : खरिपात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात...
परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नऊ...परभणी : यंदाच्या हंगामात परभणी जिल्ह्यातील पाच,...
अतिवृष्टीची ६३ लाखांची नुकसान भरपाई जमानवेखेड, जि. सांगली  : वाळवा तालुक्यात...
आंदोलनात हरियानाचे शेतकरी नाहीत :...चंडीगड  : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी...
शॉर्टसर्किटमुळे आग; आंब्याच्या झाडांचे...रत्नागिरी  : तालुक्यातील नाखरे मुंगणेकरवाडी...
तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा...अकोला : तुरीच्या पिकावर सध्या शेंगा...
ग्रामसभेला जादा अधिकार हवेतनगर (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या यशस्वितेसाठी,...
कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरा :...पुणे : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांचा परिणाम...
सांगलीत नुकसानग्रस्तांना तोकडी मदत सांगली ः शासनाने डाळिंबाला प्रति हेक्टरी २५ हजार...
शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांचे पालन नाही...मुंबई : मुख्यमंत्री पदाचे न दिलेले वचन त्यांना...
खानदेशात पूर्वहंगामी कापसाखालील ७०...जळगाव ः खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. त्यात...