संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
बातम्या
सोलापूर विद्यापीठाकडून वनस्पतींची जोपासना
सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून औषधी वनस्पतींची जोपासना होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेतून या वनस्पतींच्या प्रत्येक वृक्षावर त्याचे नाव, उपयोगितेचे फलक लावण्यात आले आहेत. योग्य नियोजन व व्यवस्थापनामुळे रणरणत्या उन्हातही विद्यापीठ कॅम्पसमधील वनराई फुलून गेली आहे.

वैशाख वणव्याने सर्वत्र वृक्षांची पानगळ होत आहे. झाडी-झुडपे नष्ट होत आहेत. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सुमारे पाच हजार झाडे सर्वांना सावली देत आहेत. औषधी वनस्पतींबरोबरच विविध फळांची झाडे, काही जंगली झाडे विद्यापीठात येणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
विद्यापीठात विविध प्रकारचे अनेक वृक्ष औषधी वनस्पतींयुक्त आहेत. मात्र विद्यापीठाने आतापर्यंत या वृक्षांची वर्गवारी केली नव्हती. कुलगुरूंच्या संकल्पनेतून या वृक्षांवर त्यांची नावे लावण्यात आली. त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना, शिक्षक व अभ्यासकांनाही कोणते झाड आहे व त्याचे फायदे काय आहेत, हे आता समजू लागले आहे.
३० प्रकारच्या वनस्पती
सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात एकूण ३० प्रकारच्या औषधी वनस्पतींचे वृक्ष आहेत. यामध्ये आवळा, बहावा, बेहडा, कांचन, कण्हेर, रिठा, रुद्राक्ष, गोरखचिंच, सावर, वड, पिंपळ, अशोक, बकुळ, अर्जुन, जांभूळ, शिरस, बेल, साग, रुई, कडुलिंब आदींचा समावश आहे. त्याचा मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदा होतो, असे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर अभ्यासकांनाही विद्यापीठ या औषधी वनस्पतींचा संशोधनासाठी फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- 1 of 1504
- ››