Agriculture news in marathi, Plant short-term cereal crops: Dr. S. B. Pawar | Agrowon

कमी कालावधीतील कडधान्य पिके लावा : डॉ. एस. बी. पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

जालना : ‘‘या विभागात अल्पभूधारक शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे. पावसाचा अनियमितपणा आणि बदलते हवामान यामुळे कमी कालावधीतील कडधान्य पिकांची सलग अथवा आंतरपीक म्हणून लागवड करावी,’’ असा सल्ला औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी पवार यांनी दिला.

मंठा तालुक्यातील मोसा येथे मूग शेती दिननिमित्त आयोजित प्रक्षेत्र भेटीप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद खरपुडी यांच्या माध्यमातून मोसा येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठनिर्मित मूग वाण बी.एम २००३-२  पिकाचे पीक प्रात्यक्षिक  शेतात घेण्यात आले होते. त्याची पाहणी या वेळी करण्यात आली.  

जालना : ‘‘या विभागात अल्पभूधारक शेतकरी बांधवांची संख्या जास्त आहे. पावसाचा अनियमितपणा आणि बदलते हवामान यामुळे कमी कालावधीतील कडधान्य पिकांची सलग अथवा आंतरपीक म्हणून लागवड करावी,’’ असा सल्ला औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी पवार यांनी दिला.

मंठा तालुक्यातील मोसा येथे मूग शेती दिननिमित्त आयोजित प्रक्षेत्र भेटीप्रसंगी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद खरपुडी यांच्या माध्यमातून मोसा येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठनिर्मित मूग वाण बी.एम २००३-२  पिकाचे पीक प्रात्यक्षिक  शेतात घेण्यात आले होते. त्याची पाहणी या वेळी करण्यात आली.  

डॉ. पवार म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाचे मूग, उडीद, सोयाबीन तूर आदी पिकांचे सुधारित वाण शेतकरी आवडीने लागवड करतात. कोरडवाहू शेतीत जमिनीची प्रत आणि त्यानुसार वाणाची निवड करणे यावर बरेच अवलंबून असते.’’ 

केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. श्रीकृष्ण सोनुने म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठ संशोधन करते. त्यामधून शिफारस झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येतो. त्यामध्ये काही वेगळेपणा आढळल्यास तेदेखील विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या नजरेत आणून देऊन परत योग्य ते तंत्रज्ञान देण्यासाठी केंद्र आणि कृषी विभाग या विस्तार यंत्रणेचा प्रयत्न असतो. या शेती दिनामुळे तंत्रज्ञान वरील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ होतो.’’   कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाबाबतच्या एकात्मिक उपाययोजनांची तांत्रिक माहिती दिली.

‘‘आपल्याला जी योजना सोयीची आणि आवश्यक वाटते. त्यात सहभागी होऊन आपले शेतीपीक उत्पादन वाढवत राहा,’’ असा सल्ला तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. राठोड यांनी दिला. विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्वर ठोंबरे, शेतकरी उद्धव खेडेकर, प्रा. आगे उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...
‘किसान सन्मान’ निधी : दोष प्रशासनाचा,...जळगाव : शासकीय यंत्रणेकडून बॅंक खात्यासंबंधीची...