agriculture news in marathi, Planting turmeric on 35 thousand hectare in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर हळद लागवड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 जुलै 2018

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदा ३५ हजार २०१ हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात ९ हजार ६४९ हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सुधारित लागवड तंत्राचा अंगीकार केल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. अन्य पिकांपेक्षा उत्पन्नाची खात्री असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा हळदीकडे वाढला आहे.

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदा ३५ हजार २०१ हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात ९ हजार ६४९ हेक्टरने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी सुधारित लागवड तंत्राचा अंगीकार केल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. अन्य पिकांपेक्षा उत्पन्नाची खात्री असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओढा हळदीकडे वाढला आहे.

विविध कारणांनी कापूस, मूग, उडीद आदी पारंपरिक पिकांपासून उत्पन्नाची खात्री नसल्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीकडे वळत आहेत. त्यामुळे हळद लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. काही वर्षांपूर्वी बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा केळी, ऊस, कापूस या पिकांवर भर असे. राज्यातील केळी उत्पादक तालुका म्हणून वसमतची ओळख होती, परंतु अनियमित, अपुऱ्या पावसामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे केळी, ऊस लागवडीवर मर्यादा आल्या, तर कपाशीवर बोंड अळी येत असल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

किफायतशीर खर्चात उत्पन्नाची खात्री असलेल्या हळदीला शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळे वसमतची ओळख आता हळद उत्पादक तालुका अशी निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, जवळाबाजार, औंढा आदी ठिकाणच्या बाजार समित्याअंतर्गत हळद मार्केट विकसित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकरी हळद लागवडीवर भर देत आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात १६ हजार ४४२ हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली होती.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...
सांगली बाजार समितीतील सौदे राहणार चार...सांगली ः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात...
पाचोरा बाजार समितीत लिलाव बंदजळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर...
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा...मंगळवेढा, जि. सोलापूर  ः पंतप्रधान पीक विमा...
नागपुरात सोयाबीन क्षेत्रात १२ हजार...नागपूर : कापूस शेतीत मजुरांची तसेच विक्रीत...
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १६.६० टक्केच...परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी...
परभणी जिल्ह्यात गरजेवेळी युरियाचा तुटवडापरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया...
शेतकऱ्यांनो, सेंद्रिय शेतीकडे वळा ः...परभणी : ‘‘अनेक पिकांचे देशी वाण मानवासाठी...
`व्हर्च्युअल गॅलक्‍सी'च्या देणेबाकीवर,...सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास...मुंबई  : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी...