Agriculture news in marathi plants and seedlings available for sale in Vanamkrivi's nursery | Agrowon

‘वनामकृवि’च्या रोपवाटिकेत कलमे, रोपे विक्रीसाठी उपलब्ध 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील मध्‍यवर्ती रोपवाटिकेत विविध फळपिकांची दर्जेदार कलमे आणि रोपटे विक्रीकरिता उपलब्‍ध आहेत, अशी माहिती मध्‍यवर्ती रोपवाटिकेचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष बरकुले यांनी दिली. 

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील मध्‍यवर्ती रोपवाटिकेत विविध फळपिकांची दर्जेदार कलमे आणि रोपटे विक्रीकरिता उपलब्‍ध आहेत, अशी माहिती मध्‍यवर्ती रोपवाटिकेचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष बरकुले यांनी दिली. 

कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेत केशर आब्याची १२ हजार कलमे, सीताफळाच्‍या बालानगर जातीची १२ हजार कलमे, करवंदाच्‍या कोकण गोल्‍ड जातीची ४ हजार कलमे, चिकुच्‍या कालीपत्‍ती, पेरूच्‍या सरदार आणि ललित वाणाची, मोसंबीच्‍या न्‍यूसेलर, लिंबाच्‍या साई शरबती, फुले शरबतीची, विक्रम, शोभीवंत झाड पाल्‍म रोपे उपलब्‍ध आहेत. येत्या जून, जुलै महिन्‍यात पेरू, डाळिंब, जांभुळ, संत्रा, लिंबू, मोंसबी, अंजीर, चिंच आदी फळपिकांची रोपे आणि कलमे उपलब्‍ध होणार आहेत. 

रोपटे आणि कलमे खरेदी तसेच बुकिंगकरिता शेतकऱ्यांनी डॉ. बरकुले यांच्‍या (९८३४२२५७९९) या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाडा विभागात विविध फळांचे संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर स्‍वतंत्र्य रोपवाटिका आहेत. यात परभणी येथे मध्‍यवर्ती रोपवाटिका आहे. औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राची स्‍वतंत्र रोपवाटिका आहे. 

बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्र, अंबेजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र येथे ही स्‍वतंत्र्य रोपवाटिका आहेत. कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना संबंधित जिल्‍ह्यातील रोपवाटिकेतून विद्यापीठाची रोपटी उपलब्‍ध करून दिली जाणार आहेत. त्‍यानुसार संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणच्या संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्रांच्या प्रक्षेत्रावरील रोपवाटिकेत ही रोपटी उपलब्‍ध करून देण्‍याचा विद्यापीठातर्फे प्रयत्न केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...