agriculture news in marathi plasma test permitted for corona pandemic | Agrowon

कोरोनावर आता प्लाझ्मा थेरपीची मात्रा; चाचणी घेण्यासाठी केरळमधील डॉक्टरांना परवानगी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये आता कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील द्रवाचा (प्लाझ्मा) वापर इतर संसर्गग्रस्तांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. भारतात प्रथमच हा प्रयोग होणार असून त्यातील निष्कर्षांनंतर या उपचार पद्धतीच्या सरसकट वापराबाबत विचार होणार आहे.
 

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये आता कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील द्रवाचा (प्लाझ्मा) वापर इतर संसर्गग्रस्तांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. भारतात प्रथमच हा प्रयोग होणार असून त्यातील निष्कर्षांनंतर या उपचार पद्धतीच्या सरसकट वापराबाबत विचार होणार आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी केरळ सरकारने स्थापन केलेल्या डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा सहभाग असलेल्या कृती दलाने भारतीय वैद्यक परिषदेकडे प्लाझ्मा थेरेपीसाठी परवानगी मागितली होती. कोरोनामुळे अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णावरच उपचार करण्यासाठी त्यांना ही परवानगी मिळाली आहे. जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी अद्यापही लस तयार झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर या उपचारकडे पाहिले जात आहे. अमेरिकेतही गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यास परवानगी आहे. मात्र, अद्याप हवे तसे परिमाण न मिळाल्याने याबाबत सखोल संशोधन आवश्यक असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे.

प्लाझ्मा थेरेपी म्हणजे काय?
या उपचार पद्धतीत कोरोनामुळे झालेल्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील काही प्लाझ्मा काढून हाच आजार झालेल्या व्यक्तीच्या रक्तात सोडला जातो. प्लाझ्मा थेरेपीमुळे रुग्ण ३ ते ७ दिवसांत बरा होऊ शकतो, अशी माहिती तिरुअनंतपुरम येथील चित्रा तिरूनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतील संशोधक डॉ. देवशीष गुप्ता यांनी दिली. ही उपचार पद्धती सुमारे शंभर वर्षे जुनी असून १९१८ ला फ्लू ची साथ आली होती, त्यावेळीही तिचा प्रयोग झाला होता.

उपचार कसा होतो ?
विषाणू किंवा जिवाणूमुळे झालेल्या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाल्यावर तिच्या शरीरात त्या विषाणू अथवा जिवाणूला विरोध करणारी प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके शरीरात अल्पकाळ किंवा कायमस्वरूपी राहतात. याचप्रमाणे, कोविड १९ विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा आजारी व्यक्तीच्या रक्तात सोडल्यास ही प्रतिजैविके विषाणूविरोधात काम करतील. ही प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या बाह्य आवरणावर हल्ला करत त्यांना मानवी पेशींमध्ये घुसण्यापासून रोखतात. यामुळे विषाणू नष्ट होऊन प्रतिकार शक्ती वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्वाधिक फायदा कोणाला?
अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांवरच प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यास परवानगी आहे. आजारातून बरे झालेल्या व्यक्तीच्या रक्तातून एकदाच काढलेल्या प्लाझ्माचा वापर दोन रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येतो. म्हणूनच या थेरेपीचा वापर करण्याची परवानगी मिळालेल्या संशोधन संस्था आजारातून बरे झालेल्यांना प्लाझ्मा देण्याचे आवाहन करत आहेत. अमेरिकेतील ह्युस्टन येथे सर्वप्रथम या थेरेपीचा वापर झाला. चीनमध्येही हा प्रयोग झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...