पीकविम्याचा होणार ४२ मंडळांतील शेतकऱ्यांना लाभ

पूर्वीच्या तुलनेत आता मंडळांची संख्या वाढल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लवकरात लवकर त्यासंबंधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
पीकविम्याचा होणार ४२ मंडळांतील शेतकऱ्यांना लाभ
पीकविम्याचा होणार ४२ मंडळांतील शेतकऱ्यांना लाभ

सोलापूर : जिल्ह्यातील ज्या अधिसूचित मंडळांत सरासरीपेक्षा पावसामुळे २५ टक्के पेक्षा कमी पेरणी झालेल्या ४२ महसूल मंडळात रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. यापूर्वी ही योजना ३१ मंडळासाठी लागू केली होती, पण आता मंडळांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण उर्वरित मंडळातही योजना लागू करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यात यंदा केवळ ३८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. खरिपासह रब्बी हंगामही पुरता वाया गेला. त्यामुळे पीक विम्यावर शेतकऱ्यांची सगळी भिस्त आहे. दुष्काळी मदतही अद्याप पोचली नाही. त्यामुळे किमान पीक विम्याचा लाभ तरी पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. पूर्वी काही मर्यादित मंडळापर्यंतच त्याचा लाभ मिळत होता. पण नव्या निर्णयामुळे हा लाभ आता ४२ मंडळापर्यंत वाढला आहे. त्यातही ज्वारीचा समावेश त्यात असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

रब्बी ज्वारी बागायत, जिरायत मंडळानुसार समाविष्ठ मंडळे (तालुकानिहाय)

दक्षिण सोलापूर मंद्रुप, होटगी, विंचुर, निंबर्गी
 करमाळा केम
पंढरपूर पंढरपूर, भंडीशेगांव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळुज, चळे,  तुंगत, कासेगाव
सांगोला सांगोला, शिवणे, जवळा, हतीद, सोनंद, कोळा, नाझरा, महुद बु., संगेवाडी
माळशिरस माळशिरस, इस्लामपूर, अकलुज, लवंग, महाळुंग. पिलीव, वेळापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com