परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांचे हाल

परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका पीककर्ज देण्यास चालढकल करत आहेत. बॅंकांचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. सुमारे १ लाखावर शेतकरी पीक कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.
The plight of farmers in Parbhani by tearing down the thresholds of banks
The plight of farmers in Parbhani by tearing down the thresholds of banks

परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका पीककर्ज देण्यास चालढकल करत आहेत. बॅंकांचे उंबरठे झिजवून शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. सुमारे १ लाखावर शेतकरी पीक कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.

सार्वजनिक, खासगी, सहकारी क्षेत्रातील बॅंकांनी मंगळवार (ता.११ ) पर्यंत जिल्ह्यातील ८२ हजार  ९११ शेतकऱ्यांना ४६२ कोटी ४३ लाख  रुपये (२७.९४ टक्के) पीक कर्जवाटप केले. त्यात नवीन ३० हजार ३२४ शेतकऱ्यांना २५८ कोटी २७ लाख रुपये पीककर्ज दिले. तर, ५२ हजार ५८७  शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नुतनीकरण केले. गतवर्षी (२०१९) जुलै अखेर केलेल्या पीककर्ज वाटपाच्या तुलनेत दुपटीहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. 

जिल्ह्यातील बॅंकांना यंदा १ हजार ६५५ कोटी २० लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. मंगळवार (ता.११) पर्यंत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १६ बॅंकांच्या शाखांमार्फत ३० हजार ३२४ नवीन शेतकऱ्यांना २५८ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जवाटप केले. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांनी १४  हजार ८१२ शेतकऱ्यांना १३९ कोटी २६ लाख रुपये, खासगी बॅंकांनी ९९५ शेतकऱ्यांना १४ कोटी ६६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १४ हजार १७ शेतकऱ्यांना १०४ कोटी ३५ लाखांचे पीककर्ज दिले. नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा बॅंकेने हात आखडता घेतला आहे.

जिल्हा बॅंकेच्या सर्वाधिक म्हणजे ४४ हजार ४७३ शेतकऱ्यांनी १४० कोटी १५ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या ४ हजार ८३९ शेतकऱ्यांची ३४ कोटी ७८ लाख रुपयाचे, राष्ट्रीय बॅंकांच्या ३ हजार ११० शेतकऱ्यांनी २८ कोटी ८ लाख रुपये, खासगी बॅंकांच्या १६५ शेतकऱ्यांनी १ कोटी १५ लाख रुपयाच्या कर्जाचे नुतनीकरण केले. बॅंकांची चालढकल सुरुच

गतवर्षी जिल्ह्यातील विविध बॅंकांनी ३१ जुलैअखेर ३५ हजार ३०५ शेतकऱ्यांना १८४ कोटी ५८ लाख रुपये (१२.५५ टक्के) पीक कर्जवाटप केले होते. त्या तुलनेत यंदा कर्जवाटपाची गती सुधारली आहे. तब्बल १ लाख ८० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले. परंतु, राष्ट्रीयकृत, खासगी, जिल्हा, ग्रामीण बॅंकेच्या अनेक शाखांमध्ये शेतकऱ्यांचे पीककर्जाचे मागणी अर्ज घेऊन तीन ते चार महिन्याचा कालावधीत झाला. मात्र, शेतकऱ्यांना कर्ज मिळता मिळत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com