परवडणाऱ्या घरांचे श्रेय नोटाबंदीला ः मोदी

परवडणाऱ्या घरांचे श्रेय नोटाबंदीला ः मोदी
परवडणाऱ्या घरांचे श्रेय नोटाबंदीला ः मोदी

सुरत : ‘‘घरांच्या किमती कमी करण्यासाठी व युवा पिढीसाठी परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचे श्रेय आपल्या सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आहे,’’ अशी भलामण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. सुरत विमानतळावरील नव्या टर्मिनलच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनानंतर मोदी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मी आतापर्यंत केलेले काम जर पूर्वीच्या सरकारने केले असते, तर त्यांना त्यासाठी आणखी २५ वर्षे लागली असती.’’ नोटाबंदीचा फायदा काय?, असा प्रश्‍न मला विचारण्यात येतो. तो तुम्ही युवकांना विचारा, की नोटाबंदीनंतर परवडणाऱ्या किमतीत घरे कोणी खरेदी केली. बांधकाम क्षेत्रात काळा पैसा दाबून टाकण्यात आला होता. नोटाबंदी व ‘रेरा’ कायद्याने आम्ही त्यावर नियंत्रण आणले, असेही ते म्हणाले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या ‘उडे देश का आम नागरिक’ (उडान) या योजनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या योजेमुळे देशातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात सरकारने १.३० कोटी घरे बांधली. पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात फक्त २५ लाख घरे उभारली गेली.   गेल्या ३० वर्षांपासून देशात त्रिशंकू संसद असल्याने प्रगती मंदावली होती. मात्र चार वर्षांपूर्वी जनतेने पूर्ण बहुमतासाठी मतदान केले. त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होत आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com