अमरावती जिल्ह्याती ‘पीएम किसान’ची ५ कोटींची बाकी

अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या अपात्र व्यक्‍तींकडे तब्बल ५.४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पैसे परतीस नकार दिला आहे. केवळ १०८ शेतकऱ्यांनीच ७.६६ लाख परत केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
PM Kisan owes Rs 5 crore in Amravati district
PM Kisan owes Rs 5 crore in Amravati district

अमरावती ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या अपात्र व्यक्‍तींकडे तब्बल ५.४८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पैसे परतीस नकार दिला आहे. केवळ १०८ शेतकऱ्यांनीच ७.६६ लाख परत केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

शेतकऱ्यांना अल्पसा आधार मिळावा, याकरिता तीन टप्प्यांत दोन हजार याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना देशभरात लागू करण्यात आली. यात जिल्ह्यातील ३,३८,३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील ३,२,५६८ शेतकऱ्यांना किमान एका हप्त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत केंद्र शासनाद्वारे ९ हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. 

जिल्ह्यात या शिवाय आयकरदाते ७,०९८ शेतकरी योजनेच्या निकषात बसत नसताना त्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे ५.८९ कोटींची रक्‍कम वसूलपात्र आहे. यात फक्‍त १,६९१ शेतकऱ्यांनी १.५० कोटींची रक्‍कम जिल्हा प्रशासनाला परत केली आहे. त्यामुळे या प्रकारात ४.३८ कोटींची रक्‍कम आयकरदात्यांकडून वसूलपात्र आहे.

शासनाद्वारा या सर्व अपात्र व्यक्‍तींना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल ५.४८ कोटींची थकबाकी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com