Agriculture news in Marathi PM kisan scheme will take back Rs 13.5 crore from farmers in Varhad | Agrowon

वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी रुपये परत घेणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस अपात्र असलेल्या तसेच आयकर भरणाऱ्यांकडून हा निधी परत घेण्याची प्रक्रीया राबवली जात आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यात सुमारे साडे तेरा कोटींपेक्षा अधिक निधी परत घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस अपात्र असलेल्या तसेच आयकर भरणाऱ्यांकडून हा निधी परत घेण्याची प्रक्रीया राबवली जात आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यात सुमारे साडे तेरा कोटींपेक्षा अधिक निधी परत घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पात्र नसतानाही सन्मान योजनेची मदत मिळालेल्यांबाबत केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कारवाई सुरू केली. आयकर खात्याकडूनही कर भरणाऱ्यांबाबत माहिती दिली जाणार आहे. केंद्र शासनाने सुरुवातीला अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ही योजना सुरू केली होती. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचा समावेश केला आहे.

वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. यात आयकर भरणारेही लाभार्थी बनले आहेत. नोकरी करणारे, सेवानिवृत्ती वेतन, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीला लाभ ही या योजनेत अपात्र ठरण्याची कारणे आहे. अशांचा शोध घेण्यासाठी तहसील पातळीवरून शोध मोहीम उघडण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात ७१०४ शेतकऱ्यांकडून ४ कोटी ८९ लाख रुपये वसुलीस पात्र असल्याचे समजते. तर बुलडाणा जिल्ह्यात ५९८६ शेतकऱ्यांकडून पाच कोटी ३३ लाख १६ हजार रुपये परत घेतले जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यात ४९९६ शेतकऱ्यांकडून ३ कोटी ८३ लाख रुपये परत घेतले जातील.

अपात्रतेची मुख्य कारणे

  • योग्य माहिती सादर न करणे
  • आधारकार्ड किंवा बॅंक खाते न जुळणे
  • पात्र नसतानाही चुकीची माहिती देणे
  • एकाच व्यक्तीने दोनदा लाभ घेणे
  • कर भरणारे असूनही लाभ उचलणे

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...