पीएम किसान योजनेच्या  लाभापासून अनेक शेतकरी वंचित

खानदेशात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नव्याने नोंदणी करताना महसूल व कृषी विभागाच्या अडवणुकीमुळे शेतकऱ्यांना अडथळे येत आहेत.
PM Kisan Yojana Many farmers are deprived of benefits
PM Kisan Yojana Many farmers are deprived of benefits

जळगाव ः  खानदेशात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत नव्याने नोंदणी करताना महसूल व कृषी विभागाच्या अडवणुकीमुळे शेतकऱ्यांना अडथळे येत आहेत. या बाबत माहिती केंद्र (एनआयसी), तहसील व कृषी विभागाकडून शिवाय योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. त्यामुळे योजनेच्या दहाव्या हप्त्यापासून सुमारे २० ते २२ हजार शेतकरी वंचित राहिले आहेत.  जिल्हा बँकेचे खाते क्रमांक १६ अंकी झाले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी खाते क्रमांक बदलल्याने आला नाही. हे खाते क्रमांक बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पोर्टलवर कार्यवाही करावी लागेल. पण या योजनेचे काम महसूल व कृषी विभाग करीत नाही. पूर्वी महसूल म्हणजेच कृषी विभाग हे काम करीत होता. परंतु आता महसूल विभागाने कामावर बहिष्कार कायम ठेवला आहे. त्यामुळे पोर्टलवरील दुरुस्ती, मंजुऱ्या मिळत नाहीत. शेतकरी त्रस्त झाले आहेत. मागील दोन महिने सतत तहसील, कृषी विभागात चकरा मारून शेतकरी कंटाळले  आहेत.  या दोन्ही विभागांच्या चाल-ढकल, कचखाऊ वृत्तीमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची स्थिती आहे. यात नव्याने नोंदणीसाठी रेशन कार्डसंबंधीचा ऑनलाइन १२ आकडी क्रमांक हवा आहे. हा क्रमांक मिळविताना पुरवठा विभाग, रेशन दुकानदारांकडे जावे लागत आहे. यातही वेळ, निधी खर्च होत आहे.  योग्य माहिती कुणी देत नाही. तसेच अनेकांना लॅण्ड रजिस्ट्रेशन आयडीबाबत संभ्रम आहे. हा आयडी कुठे मिळतो, कोण बहाल करतो, अशी स्थिती आहे.  खानदेशात सुमारे २० ते २२ हजार शेतकरी या योजनेपासून विविध अडचणींमुळे वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी केली  जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com