शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा; शेतकऱ्यांना सक्षम करणार : मोदी

शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा; शेतकऱ्यांना सक्षम करणार : मोदी
शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा; शेतकऱ्यांना सक्षम करणार : मोदी

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथून पंतप्रधान किसान योजनेस आज (रविवार) प्रारंभ केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट २ हजार रुपये जमा होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचे उत्पन्न वाढविणार असल्याचे सांगितले.

गोरखपूर येथे राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्ताने ते उपस्थित होते. त्यावेळी एका क्लिकवर देशातील १ कोटी १ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार असे एकूण २१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सर्वांत मोठी घोषणा आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मोदी सरकारकडून लागू केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता आज देण्यात आला असून, पुढील रक्कम दोन हफ्त्यात मिळणार आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, की शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. एकमेकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशात जास्त आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जमाफीमुळे फक्त जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा होतो. शेतकरी आता किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com