लॉकडाऊनवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांत आज चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. २७ ) रोजी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून याच बैठकीत लॉकडाउनचे भवितव्य ठरेल.
लॉकडाऊनवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांत आज चर्चा करणार
लॉकडाऊनवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांत आज चर्चा करणार

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन बहुतांश राज्यांनी ३ मे नंतरही लॉकडाउन कायम ठेवण्यास अनुकूलता दर्शविली असून संसर्गाचे सर्वाधिक हॉटस्पॉट असणाऱ्या महाराष्ट्र आणि दिल्लीतील लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाउन काढला तर अचानक संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो अशी भीती सर्वच राज्यांना सतावत असल्याने त्यांनी सावध भूमिका घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यंत्रणांकडून पूर्ण आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. २७ ) रोजी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून याच बैठकीत लॉकडाउनचे भवितव्य ठरेल. देशाप्रमाणेच जगातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला असून अमेरिकेतील बळींची संख्या दोन लाखांच्याही पुढे गेली आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागील चोवीस तासांमध्ये ६ टक्के इतकी घट झाली आहे. पंतप्रधान मोदी हे उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तिसऱ्यांदा चर्चा करणार आहेत. कोरोनाच्या संसर्गाविरोधातील संघर्ष, उपचार पद्धती आणि राज्य तसेच केंद्र यांच्यातील समन्वय आदी मुद्दे यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

भाजपशासित राज्यांनाही धास्ती गृहमंत्रालयाने अलीकडेच काही दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. सार्वजनिक परिवहन सेवांसह अन्य सेवा एकदम सुरू केल्या तर रुग्ण संख्येत पुन्हा मोठी वाढ होऊ शकते अशी भीती अनेक राज्य सरकारांनी व्यक्त केली आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रासह किमान सहा मोठ्या राज्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढविण्याबाबत अनुकूल मते व्यक्त केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, पंजाब, ओडिसा यासारखी बिगर भाजपशासित राज्ये आहेत. मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांबरोबर होणारी चर्चा या संदर्भात महत्त्वाचे वळण घेऊ शकते. दिल्लीत हॉटस्पॉट वाढले तेलंगणने लॉकडाउनचा कालावधी ७ मे पर्यंत वाढविला आहे, तर बिहार, केरळ, आसाम या राज्यांनी पंतप्रधानांशी चर्चा होईपर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका स्वीकारली आहे. दिल्लीत केजरीवाल सरकारने तर गृहमंत्रालयाच्या अलीकडच्या आदेशानंतरही सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी नाकारली आहे. राजधानी दिल्लीतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या वाढत वाढत शंभरच्याघरात पोहोचल्याने सरकार समोरील चिंता वाढली आहे. बाबू जगजीवनराम रुग्णालयातील चाळीसपेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने येथे घबराट उडाली आहे. हे रुग्णालयच पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. चाचण्यांच्या प्रमाणात वाढ भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ६ लाख २५ हजार ३०९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्याने स्थापन केलेल्या अधिकारिता पथकांनी कोरोनाचा प्रचंड उद्रेक असलेल्या अहमदाबाद, सुरत, हैदराबाद, चेन्नई या शहरांना भेट देऊन आढावा घेतला. अहमदाबाद तसेच सुरतमध्ये कोरोनाचा भीषण उद्रेक झाल्याचे गेल्या दोन दिवसांतील आकडेवारीवरून दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com