agriculture news in marathi PM Modi targets opposition over farm laws, says another source of black money has ended | Agrowon

काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; कृषी कायद्यांच्या विरोधकांवर मोदींची टीका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

 ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे काही लोकांचा काळा पैसा कमाविण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळेच हे लोक शेतकरी हिताच्या कायद्यांना विरोध करत आहेत. हेच लोक शेतकऱ्याचे विरोधक आहेत आणि बाजार समित्यांतील दलाल पोसले जावेत अशीच त्यांची इच्छा आहे,’’  : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे काही लोकांचा काळा पैसा कमाविण्याचे मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळेच हे लोक शेतकरी हिताच्या कायद्यांना विरोध करत आहेत. हेच लोक शेतकऱ्याचे विरोधक आहेत आणि बाजार समित्यांतील दलाल पोसले जावेत अशीच त्यांची इच्छा आहे.’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.२९) कॉंग्रेस व अकाली दलाच्या नेतृत्वावर पुन्हा हल्ला चढविला.

पंजाब-हरियानातील चौफेर विरोधाला न जुमानता राज्यसभेत सरकारने कृषी सुधारणा विधेयके मंजूर केल्यावरही याबाबतचा विरोध वाढत चालल्याने पंतप्रधान स्वतःच मैदानात उतरले आहेत. पुढच्या टप्प्यात ते संबंधित विरोधकांची थेट नावेही घेऊ शकतात, असा मतप्रवाह आहे.

उत्तराखंडमधील ‘नमामी गंगे’ प्रकल्पातील पाच परियोजनांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद् घाटन करताना पंतप्रधानांनी कृषी कायद्यांच्या विरोधावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘‘ शेतकरी ज्याची पूजा करतो त्या ट्रॅक्‍टरला आग लावून हे लोक शेतकऱ्याचा अपमान करत आहेत. गेली कित्येक वर्षे यांनीच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्याचे वायदे केले व ते कधीच पाळले नाहीत. आता स्वामिनाथन अहवालाच्या शिफारशींप्रमाणे कायदे केल्यावर त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचा कळवळा आला आहे. हे विरोधक शेतकऱ्याला खुल्या बाजारात कोठेही आपला शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळावे याचेच विरोधक आहेत. शेतकऱ्याला नव्या कायद्यांमुळे तेच स्वातंत्र्य मिळाले तेच यांना दुखत आहे. शेतकऱ्यांच्या गाड्या जप्त व्हाव्यात तसेच बाजार समित्यांतील दलाल पोसले जावे, हीच यांची इच्छा आहे. यांचा विरोध केवळ विरोधासाठी असल्याचे आता शेतकऱ्याला कळून चुकले आहे.’’

म्हणून विरोधकांना त्रास
अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या याच लोकांनी आमच्या हवाई दलाच्या, सैन्याच्या सक्षमीकरणासाठी काहीही केले नाही. हवाई दल राफेल विमाने मागत होते तर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा आमच्या सरकारने फ्रान्सबरोबर राफेल खरेदीचा करार केला तेव्हा विरोधकांना त्रास व्हायला लागला. आपल्या शूर जवानांनी चार वर्षांपूर्वी शत्रूच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केले तेव्हा हे त्या हल्ल्याचे पुरावे मागू लागले होते, अशी टीका मोदींनी केली


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...