पंतप्रधान मोदी उद्या अकलूजमध्ये, गडकरी आज सोलापुरात

पंतप्रधान मोदी उद्या अकलूजमध्ये, गडकरी आज सोलापुरात
पंतप्रधान मोदी उद्या अकलूजमध्ये, गडकरी आज सोलापुरात

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत भाजप-शिवसेना महायुती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी (ता.१६) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा आयोजला आहे. तर माढ्यासाठी बुधवारी (ता. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. 

कॉंग्रेसने शिवराज पाटील चाकूरकर, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह तेलुगू अभिनेत्री विजयाशांती यांच्या सभांनी या आधीच मैदान गाजवले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे मात्र स्वतः च थेट प्रचारात उतरून लढत देत आहेत. एकूणच प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला असून, तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. 

सोलापूर लोकसभेसाठी १८ एप्रिलला आणि माढा लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान होत आहे. मंगळवारी सोलापूर लोकसभेसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपने महायुतीचे उमेदवर डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारासाठी गडकरी यांची विजय संकल्प सभा ठेवली आहे. सकाळी दहा वाजता पार्क मैदानावर ही सभा होईल. 

मोदी यांची उद्या अकलूजमध्ये सभा उद्या बुधवारी मोदी यांची अकलूजला विजयसिंह मोहिते पाटील क्रीडासंकुलावर सकाळी दहा वाजता सभा होईल. येथे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईकनिंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोघांनीही त्यासाठी जातीने लक्ष घातले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com