मोदी आज घेणार पंतप्रधानपदाची शपथ, जय्यत तयारी; पाहुण्यांना शाही मेजवानी

मोदी यांच्या ‘राज्याभिषेका’ची जय्यत तयारी; पाहुण्यांना शाही मेजवानी
मोदी यांच्या ‘राज्याभिषेका’ची जय्यत तयारी; पाहुण्यांना शाही मेजवानी

नवी दिल्ली  : नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. गुरुवारी (ता. ३०) होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याला सुमारे साडेसहा हजार पाहुणे उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोदी यांच्या ‘राज्याभिषेका’ची जय्यत तयारी सुरू आहे. शपथविधीला येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सजले असून, सर्वांत जास्त पाहुण्यांची वर्दळ येथे पाहायला मिळेल. यात १४ देशांचे अध्यक्ष व प्रमुख नेते, राजदूत, बुद्घिवंत, चित्रपटसृष्टीतील कलाकार, क्रीडासह अन्य क्षेत्रांतील दिग्गज व राजकीय कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा देखणा; पण साधेपणाने करण्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा भर आहे. शपथविधी खुल्या प्रांगणात शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. राष्ट्रपती भवनाचे मुख्य द्वार आणि प्रमुख इमारतीच्या मधील हा अत्यंत सुंदर परिसर आहे. राष्ट्रपती भवनात येणारे पाहुणे, सरकारी प्रतिनिधींचे स्वागत याच प्रांगणा केले जाते. तसेच, ‘चेंज ऑफ गार्ड' समारंभही येथेच होतो. एखाद्या पंतप्रधानाचा शपथविधी दरबार हॉलमध्ये न होता खुल्या प्रांगणात होण्याची ही चौथी वेळ आहे. दरबार हॉल हा छोट्या समारंभांसाठी उपयोगात आणला जातो. त्याची आसनक्षमता केवळ ५०० आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी १९९० मध्ये प्रथमच याच जागेवरून पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधीही येथेच झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पहिल्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी येथेच पंतप्रधानपदाची शपथ घेऊन संसदेत प्रथमच पाऊल ठेवले होते. त्या वेळी 'सार्क' देशांच्या प्रतिनिधींसह सुमारे चार हजार पाहुणे उपस्थित होते. भोजनाचा खास बेत या वेळचा शपथविधी समारंभ साधारणपणे २०१४ प्रमाणेच होणार आहे. पाहुणेमंडळींना हा कार्यक्रम व्यवस्थित पाहता, यावा यासाठी उंच आसनांची मांडणी करण्यात येणार आहे. पाहुण्यांसाठी 'हाय टी'ची सोय केलेली आहे. यात सामोसे, राजभोगपासून अशा भारतीय पदार्थांपासून ब्रिटनमधील 'लेमन टार्ट' अशा सर्व शाकाहारी पदार्थांचा समावेश असेल. भोजन हे शाकाहारी व मासांहारी, अशा दोन्ही प्रकारांत असेल. राष्ट्रपती भवनातील स्वयंपाकघरातून याची सिद्घता होणार आहे. ज्यांना रात्री भरपेट जेवणाची सवय नसते; त्यांच्यासाठी हलक्‍या आहाराचीही सोय आहे. सुरक्षेच्या कारणावरून पाण्याच्या बाटल्यांची सोय केलेली नसल्याने अनेक जण हैराण झाले होते. ही गैरसोय लक्षात घेऊन यंदा समारंभाची वेळ सायंकाळी सात ठेवली असून, पिण्याच्या पाण्याची सोयही केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com