दरवाढ, बेरोजगारीवर पंतप्रधानांचे मौन : राहूल गांधी

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेससह विरोधकांनी सोमवारी (ता.१०) भारत बंदची हाक दिली. बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. विरोधकांनी येथील रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली.
इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेससह विरोधकांनी सोमवारी (ता.१०) भारत बंदची हाक दिली. बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. विरोधकांनी येथील रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली.

नवी दिल्ली: भाजप म्हणत होते ७० वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखविले. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. जाती-जातींत भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले. सिलिंडरचे दर चारशे रुपयांवरून आठशेवर गेले आहेत. देशाला जी गरज आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाहीत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर सर्व विरोधकांनी सोमवारी (ता. १०) भारत बंदची हाक दिली. सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन दर्शन आंदोलनाला सुरवात केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शरद यादव आदी विरोधी पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.  राहुल गांधी म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील जनतेला, युवकांना, शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. कोठेही गेले तरी आश्वासने देत होते. चार वर्षे झाली, लोकांना आता दिसायला लागले आहे, भाजपने काय करून ठेवले होते.  शेतकऱ्यांना, बेरोजगारांना मार्ग दिसत नाही. फक्त काही उद्योगपतींना मार्ग मोकळे करून दिले आहेत. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून तुमचे पैसे लुटले. नोटाबंदी का केली हे अजूनही देश समजू शकला नाही. माध्यमांना आजकाल मोकळेपणाने लिहिता येत नाही. पण, देशातील जनता तुमच्यासोबत आहे. तुम्ही मोकळेपणाने लिहा, कोणाला घाबरू नका.’’  डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, की सतत वाढणाऱ्या इंधन किमतींचा फटका या सरकारला पुढील निवडणुकीत पाहायला मिळेल. मोदी सरकारला किमतीत वाढ करण्यात रस आहे, देशहिताशी त्यांना काही देणेघेणे नाही. आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.  शरद पवार म्हणाले, की केंद्र सरकार इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार सर्व आघाड्यांवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. दर नियंत्रण सरकारच्या हातात नाही ः प्रसाद इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाही. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाचे दर हे तेल कंपन्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. तसेच, ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हात झटकले. काँग्रेसच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com