agriculture news in marathi PMkisan Tractor scheme does not exit says agriculture department | Agrowon

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना अस्तित्वातच नाही : कृषी आयुक्तालय

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही : कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक 

 पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना' अशा आशयाची बातमी सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीही सूचना प्राप्त नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा स्वरूपाच्या सोशल मिडीयावर आढळणाऱ्या फेक बातमीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालकांनी केले आहे.

 २०२०-२१ अंतर्गत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनांतर्गत ट्रॅक्टरसाठी अनुदान देय आहे. यासाठी शासनाच्या mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाइन लॉटरी पद्धतीने जेष्ठता क्रमवारी निश्चित करून उपलब्ध निधीच्या प्रमाणात पूर्वसंमती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के किंवा रुपये एक लाख २५ हजार यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतक-यांना किमतीच्या ४० टक्के किंवा रुपये १ लाख यापैकी कमी असेल याप्रमाणे अनुदान देय राहील. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...