यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून ३१ जणांना विषबाधा

कीटकनाशक फवारणीतून ३१ जणांना विषबाधा
कीटकनाशक फवारणीतून ३१ जणांना विषबाधा

यवतमाळ ः जिल्ह्यात यावर्षी पुन्हा फवारणी करताना विषबाधांच्या घटनांनी डोके वर काढले आहे. आत्तापर्यंत ३१ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून, त्यातील १५ जणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सध्या पिकावर कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू झाला आहे. या दरम्यान शेतकरी, शेतमजुरांनी फवारणी करताना आवश्‍यक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह कृषी आणि आरोग्य विभागाने केले आहे. मात्र योग्य काळजी न घेतल्यामुळे फवारणीबाधीत रुग्ण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होत आहेत. या रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी रुग्णालय प्रशासन काळजी घेत आहे. 

रुग्णालयामध्ये कीटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांसाठी उपाययोजना व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व कीटकनाशक फवारणी बाधीत रुग्ण औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत दाखल करून घेण्यात येतात. सदर रुग्णांसाठी स्वतंत्र दहा खाटांचा अद्ययावत सर्वसोयींनी युक्‍त वॉर्ड तयार करण्यात आला आहे. 

या व्यतिरिक्‍त अतिदक्षता कक्षातील पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णांसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून पथकातील विशेष तज्ज्ञ डॉक्‍टर सर्व विषबाधीत रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करतात. या पथकामध्ये एक सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक, एक वरिष्ठ निवासी व तीन कनिष्ठ निवासी डॉक्‍टर आहेत. 

कीटकनाशक फवारणी बाधीत रुग्ण दाखल होताच रुग्णाबाबत पोलिस विभागाला कळविण्यात येते व तशी नोंद घेण्यात येते, असेही प्रशासनातील सूत्रांनी सांगीतले. फवारणी बाधीत रुग्णांना सुटी झाल्यानंतर सात दिवसांसाठी औषधोपचार देण्यात येतो. त्यामध्ये रुग्णांना विषबाधेचे लक्षणे आढळल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने उपचारास्तव जाण्याचा सल्ला देण्यात येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com