Agriculture news in marathi The Pokra project cost Rs 713 crore | Agrowon

‘पोकरा’ प्रकल्पाने खर्च केले ७१३ कोटी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे ७१३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सुमारे एक लाख ९३ हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.

अकोला ः राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने १५ जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे ७१३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सुमारे एक लाख ९३ हजारांवर लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मार्च महिन्याची क्रमवारी प्रकल्पाने जाहीर केली असून, योजनांचा खर्च, कामकाजात मराठवाड्यातील तालुके अग्रेसर आहेत. 

राज्यात १८ मे २०१८ पासून विदर्भ, मराठवाडा व खानदेशातील एकूण १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांत हा प्रकल्प सुरू आहे. हवामान बदलामुळे सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी पाठबळ देण्याचा प्रमुख उद्देश आहे. 

या प्रकल्पाच्या कार्यकक्षेत असलेल्या १५ जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख ४३८५५ शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत नोंदणी केली आहे. या अर्जांपैकी १९३३७० शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५७ कोटी निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. पाण्याचा ताळेबंद तयार असलेल्या गावात मृद्‌ व जलसंधारणाची ६४० कामे पूर्ण झाली आहे. त्यासाठी १२.१२ कोटी रुपये देण्यात आले. याच प्रकल्पातून काढणीपश्‍चात व्यवस्थापन व मूल्य साखळीचे बळकटीकरण या घटाअंतर्गत १३९ शेतकरी गट, बचत गट व उत्पादक कंपन्यांच्या भाडेतत्त्वावर अवजार बँक, शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था, बियाणे प्रक्रिया व बियाणे साठवणूक, शेती उत्पादनांचे संकलन, वर्गीकरण व प्रतवारी, तेलघाणी, पशुखाद्य निर्मिती, हळद प्रक्रिया इत्यादी सारख्या कृषी उद्योगांकरिता १४.८५ कोटींचे अनुदानही देण्यात आले. 

आता तालुकानिहाय कामांचा निर्देशांक 
प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड, वैयक्तिक शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अस्तरीकरण, विहीर पुनर्भरण, पंप संच इत्यादी घटकांना पूर्वसंमती देण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रकल्प अंमलबजावणीची प्रगती अवलंबून आहे. त्यामुळे सदर आढावा घेण्यासाठी १५५ तालुका कृषी अधिकारी यांच्या कामाची प्रगती मोजमापासाठी दरमहा परफॉर्मन्स निर्देशांक तयार केला जाणार आहे. यामध्ये सध्याच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या परफॉर्मन्स निर्देशांकात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुका अव्वल ठरलेला आहे. याच जिल्ह्यातील पाच तालुके पहिल्या सहामध्ये आहेत. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हा तालुका सर्वांत शेवटच्या म्हणजे १५५ व्या स्थानावर आहे. तर अकोला जिल्ह्यातील एकही तालुका पहिल्या ५० मध्येही आलेला नाही. यावरून अकोला जिल्ह्यात प्रकल्पाच्या कामांची स्थिती दिसून येते. 

मेहकरचा आनंद क्षणिक 
पोकरा प्रकल्पाकडून आधी जाहीर केलेल्या निर्देशांक क्रमवारी यादीत बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका पहिल्या क्रमांकावर दाखविण्यात आला होता. समाज माध्यमातून कृषी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ही कामगिरी फिरवली. शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला होता. मात्र ही क्रमवारी चुकून तयार झाली होती. त्यानंतर सुधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात मेहकर तब्बल १३५ व्या स्थानावर मागे गेल्याचे दिसून येते. तर पहिल्या स्थानी वैजापूर आले. 


इतर बातम्या
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
‘शेती’वरही निर्बंध; दुकाने फक्त 'या'...पुणे : कोरोना विषाणूच्या जीवघेण्या साथीला पायबंद...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
मोसंबीच्या वाण निवडीसाठी संशोधन...औरंगाबाद : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या अस्तित्वात...
जगाची ‘फळांची करंडी’ होण्याची...पुणे ः ‘घरी ज्याच्या फळांची करंडी तोची असे खरा...
कोकणात बांधावरच्या पिकांची होणार...पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात...
विदर्भात आजपासून पावसाची शक्यतापुणे : विदर्भाच्या अनेक भागांत अंशतः ढगाळ...
राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...