खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी आज पोकराचा ई-परिसंवाद 

अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाअंतर्गत येत्या खरीप हंगामात खारपाण पट्ट्यात उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने चर्चेसाठी शुक्रवारी (ता. २९) सकाळी ई-परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ व अनुभवी शेतकरी सहभागी होऊन मार्गदर्शन करतील.
Pokra's e-seminar today on increasing productivity in the saline belt

पोकरा प्रकल्प राज्यातील १५ जिल्‍ह्यांत ५१४२ गावात राबविल्या जात आहे. या गावांमध्ये अमरावती, बुलडाणा, अकोला व जळगाव जिल्ह्यांतील ९३२ खारपाण पट्ट्यातील गावे येतात. या गावांमध्ये आगामी हंगामात उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या अनुषंगाने असलेल्या समस्यांवर मात करीत विद्यापीठाची शिफारस असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जाईल. 

प्रामुख्याने शेती शाळांच्या माध्यमातून हवामान अनुकूल तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे. यात जमिनीवर २० बाय २० मीटरचे चौरस वाफे बनविणे, उताराला आडव्या सऱ्या पाडणे, समतल कंटूर सऱ्या, उताराला आडवी पेरणी, सरीआड सरी उघडणे, उताराला कंटूरनुसार सरीआड सरी उघडणे, शेततळे आणि सूक्ष्मसिंचन, भूसुधारकांचा (जिप्सम) वापर करणे याचा समावेश आहे. या तंत्राबाबत परिसंवादात चर्चा केली जाईल. 

खारपाण जमिनीची उत्पादकता वाढविणे या विषयावर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ई-परिसंवाद होत आहे. यात शेतकऱ्यांनी bit.ly/३d७WPk७ या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हावे किंवा bit.ly/२xlcsVS या लिंकवर क्लिक करून PoCRA Youtube चॅनेलवर हा परिसंवाद पाहावा, असे आवाहन प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com