‘पोकरा’चे सुमारे १४ कोटींचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित

हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत विविध घटकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना १३ कोटी ९४ लाख रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली.
Pokra's grant of around Rs 14 crore distributed to the beneficiaries
Pokra's grant of around Rs 14 crore distributed to the beneficiaries

हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील वसमत तालुक्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत विविध घटकांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना १३ कोटी ९४ लाख रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली. ‘पोकरा’च्या अंमलबजावणीसाठी वसमत तालुका विभागात तिसरा, तर जिल्ह्यात पहिल्या क्रमाकांवर आहे’’, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी दिली.

‘पोकरा’अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात वसमत तालुक्यातील एकूण ४६ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ग्रामसंजीवनी समित्या स्थापन करण्यात आल्या. या गावांतील ८ हजार ३७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर २४ हजार ९८४ घटकांसाठी अर्ज केले. त्यापैकी पात्र १० हजार ६२७ घटकांसाठी पूर्वसंमती देण्यात आली. एकूण ४ हजार ६९३ लाभार्थींनी विविध घटकांचा लाभ घेतला आहे. 

लाभार्थ्यांत सामुहिक शेततळे १२, ठिबक संच १ हजार ३२, तुषार संच १ हजार  ६२३, फळबाग लागवड ९८, बीजोत्पादन कार्यक्रम २३८, पाइप ९४४, विद्युत पंप ६३४, गांडुळ खत गट ३, ट्रॅक्टर १, शेडनेटगृह १,  तुती लागवड ९, नाडेप खत निर्मिती २, मत्स्यपालन ६, सेंद्रिय शेती गट १ आदी बाबींचा समावेश आहे. या अंतर्गत १३ कोटी ९४ लाख रुपये अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर (डिबीटी) जमा करण्यात आले. 

पूर्वसंमती देण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित घटकांची कामे तत्काळ पूर्ण करून देयके संबंधित पोर्टलवर अपलोड करावीत. त्याबाबत संबंधित कृषी सहाय्यकांना माहिती द्यावी, असे आवाहन कल्याणपाड यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com