खानापूर येथे ऊस आंदोलन चिघळले; पोलिसांचा हवेत गोळीबार

खानापूर (ता. शेवगाव, जि. नगर) येथे ठिकठिकाणी टायर व लाकडी ओंडके जाळून आंदोलकांनी निषेध केला.
खानापूर (ता. शेवगाव, जि. नगर) येथे ठिकठिकाणी टायर व लाकडी ओंडके जाळून आंदोलकांनी निषेध केला.

शेवगाव, जि. नगर : ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसापासून सुरु केलेल्या आंदोलनाला खानापूर येथे बुधवारी (ता. १५) पोलीसांनी केलेल्या लाठीमार व गोळीबारामुळे हिंसक वळण लागले. पोलीसांनी केलेल्या गोळीबारात उध्दव विक्रम मापारी (वय ३६) बाबुराव भानुदास दुकळे (वय ४३) राहणार तेलवाडी (ता. पैठण) हे शेतकरी जबर जखमी झाले आहेत. संतप्त झालेल्या शेतक-यांनी जागोजागी शेवगाव-पैठण राज्यमार्ग टायर व लाकडी ओंडके जाळत बंद पाडला. 

परिस्थितीचे तणाव पुर्ण होत असल्याचे पाहून पोलीसांनी शीघ्र कृती दलास पाचारण केले. आंदोलकांनी पोलीसांवर व त्यांच्या वाहनांवर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले. बसस्थानकाजवळ आंदोलकांनी रस्ता बंद करुन दोन्ही बाजूने पोलीसांना घेरले. यावेळी पोलीसांनी आश्रुधुराचे नळकांडे फोडत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीसांनी हवेत गोळीबार करत आंदोलकांवर लाठीमार करुन ११ जणांना ताब्यात घेतले. या झटापटीत २५ ते ३० शेतकरी, पोलीस उपाधिक्षक सुदर्शन मुंढे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. गोळीबारातील जखमींना शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात आणले. मात्र यातील मापारी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आंदोलन सुरु असले तरी त्यात प्रवाशांना वेठीस धरल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागाला. आंदोलकांना पांगविण्यासाठी त्यांच्यावर प्लास्टीकच्या छर्रयांनी गोळीबार केला असल्याचे पोलीस अधिका-यांचे म्हणणे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com