Agriculture news in marathi Police patrols every month Pay 15 thousand honorarium | Agrowon

पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 मार्च 2021

पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याबरोबच इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच देण्यात आले. 

नाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामपोलिस अधिनियमामध्ये आवश्यक ती दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जेणेकरून पोलिस पाटलांची प्रतिष्ठा अबाधित राहील. पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार रुपयांचे मानधन देण्याबरोबच इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की इतिहासकाळापासून चालत आलेली पाटिलकी १९६७ पासून ग्राम पोलिस पाटील अधिनियमात समाविष्ट करण्यात आली. बिंदू नामावलीनुसार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे ग्राम पोलिस अधिनियमांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जेणेकरून पोलिस पाटलांची प्रतिष्ठा अबाधित राहील. पोलिस पाटलांचे मानधन दरमहा १५ हजार रुपये करण्यात यावे, वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्यात यावी, २०१२ पासून प्रवास भत्ता मंजूर आहे तो शासनाने त्वरित अदा करावा, पोलिस पाटलांचे नूतनीकरण कायमस्वरूपी थांबवावे, ग्रामपातळीवर ग्रामस्थांना जे दाखले लागतात ते देण्याचा अधिकार पोलिस पाटलांना द्यावा व त्याचे धोरण शासनाने निश्‍चित करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इतर प्रमुख मागण्या 

  •     पोलिस पाटील सहकारी संस्थेमध्ये निवडणूक लढू शकतो, त्या संदर्भात स्पष्टता आणावी.
  •     अतिरिक्त गावचा पदभार सांभाळणाऱ्या पोलिस पाटलांना अतिरिक्त मोबदला मिळावा.
  •     प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलिस पाटील भवन उपलब्ध करून देण्यात यावे.
  •     कोरोना काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटलांना पन्नास लाखांचा विमा संरक्षण ताबडतोब मंजूर करावा. नाकाबंदी करताना मारहाण झाल्यास वैद्यकीय मोबदला मिळावा.
  •     वेल्फेअर फंडाची स्थापना करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी.
  •     बंद झालेले राज्यपाल पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात यावेत.
  •     कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास आरोपीवर कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

इतर ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
डाळिंब सल्लाहस्त बहर उशिरा घेतला असेल तर फळांना बटर पेपर बॅग...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारीनवीन आंबा लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील...
कृषी सल्ला : सुरु ऊस, कांदा, फळपिकेवातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या...
राज्यात उष्ण, ढगाळ हवामानसोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
देशात ‘जमीन सुपोषन व संरक्षण जनजागरण’...औरंगाबाद : संपूर्ण देशभरात मंगळवारपासून (ता. १३...
निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रँक्टर...अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार,...