भाजीपाला-किराणा वाहतुकीसाठी पोलिसांनी सहकार्य करावे ः डॉ. म्हैसेकर

पुणे: कोरोना लॉकडाऊन मध्ये बाजार समितीमधील फळे भाजीपाला आणि किराणा भुसार विभागातील सेवा सुरळीत राहण्याबरोबर शहरातील या वस्तूंच्या वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाने विना अडथळा सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
Police should cooperate for vegetable-grocery transportation: Mhasecar
Police should cooperate for vegetable-grocery transportation: Mhasecar

पुणे : कोरोना लॉकडाऊन मध्ये बाजार समितीमधील फळे भाजीपाला आणि किराणा भुसार विभागातील सेवा सुरळीत राहण्याबरोबर शहरातील या वस्तूंच्या वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाने विना अडथळा सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. 

पोलिसांच्या अडवणुकीमुळे भुसार विभाग बंद करण्याची भूमिका पूना मर्चंट चेंबर आणि हमाल पंचायतीने ने घेतल्यानंतर बाजार समिती, पूना मर्चंट चेंबर, अडते, हमाल, तोलणार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनासोबत विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. म्हैसेकर यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पणन संचालक सुनील पवार, पुरवठा विभागाचे उपायुक्त जयंत पिंपळगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव विजय मुथा, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे तसेच हमाल संघटना आदी उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल याबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तू सुरळीत सुरू राहण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या वस्तूंची वाहतूक रस्त्यात पोलिसांनी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येतील. तसेच आत्तापर्यंत पोलीस प्रशासनमार्फतही अत्यावश्यक सेवेतील काही ट्रक, टेम्पोचालक यांना पासेस वितरण करण्यात आले आहेत. त्यांना मालवाहतुकीस ये-जा करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची जिल्हा प्रशासन पुरेपूर खबरदारी घेईल. बाजार समिती कामगारांनाही पास देण्यात येतील. परंतु त्या पासचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.’’ कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. दररोज ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या कामगारांसाठी राहण्याची, जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल, असेही ते म्हणाले. 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध संघटनांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या बाबत योग्य ते मार्गदर्शनही डॉ.म्हैसेकर यांनी केले. 

ससूनची अकरा मजली इमारत कार्यान्वित होणार ः डॉ. म्हैसेकर  कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव शहरात वाढत असल्याने अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ससून रुग्णालयातील नवीन अकरा मजली इमारत सोमवार (आज) पासून कार्यान्वित होत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली. या नवीन व्यवस्थेच्या व्यवस्थापनेची जबाबदारी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com