ऊसतोड कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक

तहसीलदार होण्याचं माझं स्वप्न असून, तहसीलदार होणारच. हे यश मिळवण्यामागे मला घराच्या सदस्यांनी दिलेले प्रोत्साहन, मोठ्या भावांचा असलेला आर्थिक व भावनिक आधार, कधी कधी केलेल्या सुखाचा त्याग मी कधीच विसरू शकत नाही. - सीमा खडांगळे, खरवंडी
ऊसतोड कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक
ऊसतोड कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक

येवला : संघर्षाला फळ असतेच अन्‌ यशावर कुणाची बांधिलकी नसते, हे तालुक्‍यातील दुर्गम भागातील खरवंडी येथील एका ऊसतोड कामगाराच्या लेकीने सिद्ध केले आहे. येथील सीमा खडांगळे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली.

खरवंडी येथील काशीनाथ खडांगळे हे ऊसतोड कामगार... वडील, पाच चुलत्यांसह एकत्रित कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची. ऊसतोड सोडून दुसरा पर्याय  नाही. अशिक्षित असूनही चुलते कारभारी खंडागळे यांची जबरदस्त इच्छाशक्ती व शिक्षणावरील विश्वास, भावनिक आधार, घरातील संस्कार व चुलत्यांची हिंमत सीमासाठी प्रेरक ठरली. गावात चौथीपर्यंत, तर मनमाडला दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सीमाचा लहानपणापासून पोलिस खात्यात जायचे, असा मानस होता. प्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरू केला. पोलिसाची नोकरी एका गुणाने गेली, त्याच मैदानावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देत यशाला गवसणी घातली.

वसतिगृहात राहून तिने एमए (इंग्रजी) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच अभ्यासिकेत अभ्यास करत जिद्दीने यशाची फुले फुलवली. फुले, शाहू, आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार व घरातील प्रत्येकाचा खंबीर आधार होता. यांच्या जीवावरच मी या पदापर्यंत पोचू शकले असा तिचा उदात्त विचार आहे. तिच्या या यशाची माहिती मिळताच उपसभापती रूपचंद भागवत, देवीदास जानराव, एकनाथ भालेराव, ज्ञानेश्‍वर भागवत, मनोज भागवत यांनी या कुटुंबीयांची भेट घेऊन यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com