बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी धोरण हवेः शहा

संपूर्ण जगाला बासमती पुरवणारा एकमेव देश असल्याने निर्यात टिकून राहिली; परंतु बिगर बासमती तांदळाचे दर इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त होते. त्यामुळे चीन, इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी कमी दरात बिगर बासमतीची निर्यात केली. परिणामी, भारताची निर्यात घटली. चालू वर्षात बिगर बासमती तांदळाची निर्यात वाढवायची असेल तर धोरण आखणे गरजेचे आहे. - राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष ‘फाम’ आणि प्रमुख निर्यातदार
rice
rice

पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत यंदा चीन, इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी भारतापेक्षा कमी दरात बिगर बासमतीची निर्यात केल्याने, भारतातून होणाऱ्या निर्यातीत मोठी घट झाली. चालू वर्षात बिगर बासमती तांदळाची निर्यात वाढवायची असेल, तर सरकारने याकडे लक्ष देत धोरण आखणे गरजेचे आहे, असे मत फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि तांदळाचे प्रमुख निर्यातदार राजेश शहा यांनी व्यक्त केले.    बासमती आणि बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीबाबत शहा म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात (२०१९-२०) भारतातून ४४.५० लाख टन (३१ हजार २५ कोटींचा) बासमती तांदळाची निर्यात झाली. २०१८-१९ मध्ये ही निर्यात ४४.१० लाख टन (३२ हजार ८०५ कोटींची) झाली होती. याचे कारण त्या वर्षी बासमतीचे देशातील उत्पादन चांगले असल्याने दरदेखील १० ते १५ टक्क्यांनी कमी होते. भारतातून जगातील सुमारे ५० पेक्षा जास्त देशांना बासमतीची निर्यात होते. यामुळे ही निर्यात टिकून राहिल्याने मोठा फरक पडलेला नाही. ‘‘मात्र बिगर बासमतीच्या निर्यातीत मोठी घट झाली. २०१९-२० मध्ये बिगर बासमती (आंबेमोहोर, मसुरी, सोनामसुरी, बॉईल्ड राईस, इंद्रायणी इत्यादी) तांदळाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली. सन २०१७-१८ मधील ८६.३५ लाख टनांवरून २०१८-१९ मध्ये ७५.३५ लाख टन; तर २०१९-२० मध्ये फक्त ५०.३५ लाख टन निर्यात झाली,’’ असे शहा यांनी सांगितले. २०१७-१८ मध्ये बिगर बासमती तांदळाची २२ हजार ९३० कोटी रुपये इतकी निर्यात झाली होती. २०१८-१९ मध्ये २० हजार ९०० कोटी; तर २०१९-२० मध्ये सर्वांत कमी १४ हजार ३५० कोटी इतकी झाली. म्हणजेच निर्यातीत ६ हजार ५५० कोटींची घट झाली. सन २०१९-२० मध्ये बिगर बासमतीची निर्यात ३३ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com