agriculture news in Marathi policy for export of non basmati rice Maharashtra | Agrowon

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी धोरण हवेः शहा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

संपूर्ण जगाला बासमती पुरवणारा एकमेव देश असल्याने निर्यात टिकून राहिली; परंतु बिगर बासमती तांदळाचे दर इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त होते. त्यामुळे चीन, इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी कमी दरात बिगर बासमतीची निर्यात केली. परिणामी, भारताची निर्यात घटली. चालू वर्षात बिगर बासमती तांदळाची निर्यात वाढवायची असेल तर धोरण आखणे गरजेचे आहे.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष ‘फाम’ आणि प्रमुख निर्यातदार

पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत यंदा चीन, इंडोनेशिया, मलेशियासारख्या देशांनी भारतापेक्षा कमी दरात बिगर बासमतीची निर्यात केल्याने, भारतातून होणाऱ्या निर्यातीत मोठी घट झाली. चालू वर्षात बिगर बासमती तांदळाची निर्यात वाढवायची असेल, तर सरकारने याकडे लक्ष देत धोरण आखणे गरजेचे आहे, असे मत फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (फाम) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि तांदळाचे प्रमुख निर्यातदार राजेश शहा यांनी व्यक्त केले.   

बासमती आणि बिगर बासमती तांदळांच्या निर्यातीबाबत शहा म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात (२०१९-२०) भारतातून ४४.५० लाख टन (३१ हजार २५ कोटींचा) बासमती तांदळाची निर्यात झाली. २०१८-१९ मध्ये ही निर्यात ४४.१० लाख टन (३२ हजार ८०५ कोटींची) झाली होती. याचे कारण त्या वर्षी बासमतीचे देशातील उत्पादन चांगले असल्याने दरदेखील १० ते १५ टक्क्यांनी कमी होते. भारतातून जगातील सुमारे ५० पेक्षा जास्त देशांना बासमतीची निर्यात होते. यामुळे ही निर्यात टिकून राहिल्याने मोठा फरक पडलेला नाही.

‘‘मात्र बिगर बासमतीच्या निर्यातीत मोठी घट झाली. २०१९-२० मध्ये बिगर बासमती (आंबेमोहोर, मसुरी, सोनामसुरी, बॉईल्ड राईस, इंद्रायणी इत्यादी) तांदळाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली. सन २०१७-१८ मधील ८६.३५ लाख टनांवरून २०१८-१९ मध्ये ७५.३५ लाख टन; तर २०१९-२० मध्ये फक्त ५०.३५ लाख टन निर्यात झाली,’’ असे शहा यांनी सांगितले.

२०१७-१८ मध्ये बिगर बासमती तांदळाची २२ हजार ९३० कोटी रुपये इतकी निर्यात झाली होती. २०१८-१९ मध्ये २० हजार ९०० कोटी; तर २०१९-२० मध्ये सर्वांत कमी १४ हजार ३५० कोटी इतकी झाली. म्हणजेच निर्यातीत ६ हजार ५५० कोटींची घट झाली. सन २०१९-२० मध्ये बिगर बासमतीची निर्यात ३३ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला.

टॅग्स

इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...