agriculture news in Marathi, policy for farmers producers company, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकरी कंपन्यांसाठी धोरण

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

पुणे: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या भविष्यकालीन वाटचालीला दिशा देण्यासाठी राज्यस्तरीय धोरण ठरविण्यास कृषी सचिव एकनाथ डवले यांनी अनुकूलता दर्शविली आहे. “विविध पिकांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रित चर्चेतून धोरणाचा कच्चा आराखडा तयार करावा,” अशीदेखील सूचना सचिवांनी केली आहे. 

पुणे: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या भविष्यकालीन वाटचालीला दिशा देण्यासाठी राज्यस्तरीय धोरण ठरविण्यास कृषी सचिव एकनाथ डवले यांनी अनुकूलता दर्शविली आहे. “विविध पिकांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रित चर्चेतून धोरणाचा कच्चा आराखडा तयार करावा,” अशीदेखील सूचना सचिवांनी केली आहे. 

वाढत्या खर्चामुळे वैयक्तिक शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून उत्पादन ते विक्री अशा साखळीत सहभागी व्हावे, असा केंद्र व राज्य शासनाचा गेल्या काही वर्षांपासूनचा आग्रह आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची संकल्पना पुढे आणली गेली.  केंद्र, राज्य शासन, नाबार्ड, कृषी आयुक्तालयामार्फत विविध योजना आणल्या गेल्या. त्यातून हजारो कंपन्या तयार झाल्या. मात्र, या कंपन्यांचे पुढे नेमके काय करायचे, असा प्रश्न तयार झालेला आहे.  

“गटशेतीच्या नावाखाली राज्यात दोन हजार कंपन्या तयार झाल्या. मात्र, काही निवडक कंपन्या सोडल्या तर बहुतेक तालुक्यांमध्ये कागदी घोडे नाचविले जात आहेत. या कंपन्या कंपनी कायद्याखाली स्थापन झाल्याने नियमावलीत बांधल्या गेल्या आहेत. नियमावली कागदोपत्री पाळण्यासाठी देखील भरमसाट खर्च येत असल्यामुळे कंपन्यांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे धोरण न ठरविल्यास कंपन्यांना टाळे ठोकावे लागेल, अशी माहिती कंपन्यांच्या सूत्रांनी दिली. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काही कंपन्यांनी कृषी सचिवांशी नुकतीच चर्चा केली. “कंपन्यांसाठी धोरण तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. धोरण तयार करण्यास सचिवांनी पाठिंबा दर्शविला.

कंपन्यांनीच प्रथम एकत्र येऊन कच्चा आराखडा तयार करण्याची सूचनाही केली,” अशी माहिती कंपनी सूत्रांनी दिली. दरम्यान, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची देखील कंपनी प्रतिनिधींनी भेट घेतली. “विविध पिकांवर कंपन्या काम करीत आहेत. प्रत्येकाची कामाची दिशा व अपेक्षा वेगवेगळी असते. त्यामुळे कंपन्यांनी आपली मांडणी सूत्रबद्धपणे तयार करावी. धोरण तयार होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू,” असे आश्वासन आयुक्तांनी दिले. 

कंपन्यांना पुन्हा बियाणे अनुदान
राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या बियाणे उत्पादन व वितरणात उत्तम काम करीत असल्यामुळे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करण्याबाबत कृषी सचिव व आयुक्त अनुकूलता दर्शविली आहे. दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिक्विंटल चार हजार तर दहा वर्षांच्या वरील वाणांकरिता अडीच हजार रुपये अनुदान या कंपन्यांना जात होते. २०१७ पासून अनुदान नाकारल्याने कंपन्या अडचणीत आल्या. मात्र, आता ही समस्या येत्या खरिपात उद्भवू नये, यासाठी कृषी आयुक्तालय सकारात्मक भूमिका घेत असल्याचे कंपनी सूत्रांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
जुन्नर तालुका झाला 'टोमॅटो क्लस्टर'सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधनरत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये...
मळीवरील निर्यातबंदी उठविलीमुंबई : राज्यात ‘कोरोना’च्या...
कीड- अवशेषमुक्त शेतीमाल निर्यातीसाठी २१...पुणे : भारतीय शेतीमालास जगभरातून मागणी असताना,...
आजपासून कृषी संजीवनी सप्ताहपुणे  : पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला...
खरीप हंगामासाठी पीकविमा योजना लागूपुणे : शेतकऱ्यांना उत्सुकता लागून असलेल्या...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
शेती बदलते आहे कूस!पुणे  ः गेल्या आठ ते दहा वर्षांत...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...
सुगंधी जिरॅनियम शेतीसह प्रक्रियेलाही...ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख...
विक्री तंत्रांमध्ये होतोय बदलशेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही...
चव, रंगाचे वैशिष्ट्य राखून असणारा...सोलापूरसारख्या दुष्काळी भागात डाळिंब,...
विक्री व्यवस्थेत बदल करून शेतकऱ्यांनीच...अलीकडील वर्षांत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्री...
फूलशेतीतून मिळाली नवी दिशासांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष,...
लिंबाच्या ‘क्लस्टरने सुधारले अर्थकारणपरभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच...