agriculture news in Marathi policy for raisin and jagery export Maharashtra | Agrowon

बेदाणा, गूळनिर्यात धोरण लवकरच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 जानेवारी 2021

कृषी उत्पादनांच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण आखले जात आहे.

पुणे ः कृषी उत्पादनांच्या निर्यातीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाप्रमाणेच राज्याचे निर्यात धोरण आखले जात आहे. यामध्ये विविध २१ पिकांसाठी क्लस्टरनिर्मिती केली असून, यामधील गूळ आणि बेदाणा निर्यात धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. यासाठीच्या तज्ज्ञांसह संबंधित घटकांच्या बैठका नुकत्यात झाल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले, ‘‘राज्यातील शेतीमालाचे प्रक्रिया आणि मूल्यवर्धन बांधावरच करण्याचे प्रयत्न निर्यात धोरणाच्या आखणीमध्ये केले जात आहे. हे धोरण आखताना पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराज देसाई, पणन सचिव अनुपकुमार यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच गूळ आणि बेदाणा निर्यात धोरणासाठीची बैठक झाली.

बैठकीमध्ये बेदाणा व गुळाच्या निर्यात संधी व वाव, सोई-सुविधा व आवश्यक असलेल्या उपाययोजना, अपेडा व कृषी पणन मंडळाच्या अर्थसाह्य योजना, बेदाणा व गूळ संदर्भात हाताळणी, वाहतुकीबाबत समस्या व उपाययोजना याबाबत चर्चा करून ब्रॅण्डिंग, निर्यात वृद्धीकरिता बाजार विकासासाठी उपाययोजना निर्यात वृद्धीकरिता नावीन्यपूर्ण बाबी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

तसेच  सांगलीच्या बेदाण्याला व कोल्हापूरच्या गुळास भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे, निर्यातीमध्ये भौगोलिक मानांकनाचे महत्त्व व ब्रॅण्डिंगकरिता त्याचा वापर कसा वापर करता येऊ शकेल यावर चर्चा झाली. भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनाकरिता पणन मंडळाच्या अर्थसाह्य योजनेचा फायदा संबंधित उत्पादक व संस्थेने करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले.’’

प्रतिक्रिया
राज्यातील कृषी उत्पादनांचा आवाका विचार घेता राज्याच्या कृषी निर्यात धोरणामध्ये राज्यातील प्रमुख पिके आणि उत्पानांच्या २१ क्लस्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामधील बेदाणा आणि गुळाच्या क्लस्टरबाबतची बैठका नुकत्याच घेण्यात आल्या. 
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी मंडळ, पुणे


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...