agriculture news in marathi political changes may heat zhilla parishad, nagar maharashtra | Agrowon

नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत सत्तांतराचे वारे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे जिल्हा परिषदेतही असाच प्रयोग करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या राजकारणात रंगत येणार आहे. 

नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येण्याची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे जिल्हा परिषदेतही असाच प्रयोग करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या राजकारणात रंगत येणार आहे. 

सद्यःस्थितीत काँग्रेसच्या शालिनी विखे पाटील या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा रंगत आहेत. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा एकत्र येण्याचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसत असल्याने ‘मिनी मंत्रालयातील’ धुरीणांनी या प्रयोगाची जिल्ह्यात चाचपणी सुरु केली आहे. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचे पती आमदार राधाकृष्ण विखे पाटील व पुत्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला, तरी शालिनीताईंनी मात्र आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले आहे.

जिल्हा परिषदेच्या राजकारणातून विखे पाटील यांना दूर सारण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर खलबतं सुरू केली आहेत. शालिनीताई विखे जरी तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असल्या तरी भाजपच्या कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती लपून राहिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातला थोरात गट व राष्ट्रवादी आधीच सावध झाले आहेत. आरक्षणाची पद्धत सुरू झाल्यापासून शालिनीताई विखे यांनी सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविले आहे.

आता आरक्षण पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी पडले आहे. त्यामुळे  शालिनीताई विखे यांना पुन्हा संधी असल्याचे बोलले जात असून, त्यांना नव्याने अध्यक्ष होण्यासाठी पुन्हा शुभेच्छाही दिल्या जात आहेत. विधानसभेनंतर आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याने त्यांच्याकडील मतं ही शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात पडू शकतात, असा कयास बांधला जात आहे. त्यामुळे त्यांच्या एखाद्या सदस्याला समिती सभापतिपद मिळू शकते, तर शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य ऐनवेळेस कुणासाठी धनुष्याला ताण देणार हे पाहणेही महत्त्वाचे आहे. अध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्यांना अंदाजपंचे ठोकताळे बांधावे लागत असून, अध्यक्षपदाचे सूत जुळेना झाले आहे.

जिल्हा परिषदेतील सध्याचे संख्याबळ 
काँग्रेस   २३ 
राष्ट्रवादी १९
शिवसेना
भाजप  १४
क्रांतिकारी शेतकरी पक्ष
महाआघाडी
कम्युनिस्ट  
शेतकरी विकास मंडळ 
जनशक्ती 

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...