‘कोरोना’ नमुन्यांवरून अमरावतीत राजकारण तापले 

अमरावती ः खासदार, आमदारांचे घशातील स्त्राव सदोष पद्धतीने घेण्यात आले. त्यावरूनच प्रशासन ‘कोरोना’बाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांनी ही तक्रार केली.
Politics in Amravati heats up with 'Corona' testing method
Politics in Amravati heats up with 'Corona' testing method

अमरावती ः खासदार, आमदारांचे घशातील स्त्राव सदोष पद्धतीने घेण्यात आले. त्यावरूनच प्रशासन ‘कोरोना’बाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत याप्रकरणी थेट मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. आमदार रवी राणा यांनी ही तक्रार केली. 

सलग तीन दिवस ताप असल्याने आमदार रवी राणा हे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यासह त्यांच्या संपर्कात असलेल्या त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांचे घशातील स्त्राव प्रशासनाकडून घेण्यात आले. 

नागपूरच्या एम्स मधील प्रयोगशाळेकडून ते नमुने सदोष असल्याचे सांगत पुन्हा नमुने घेण्याचे सांगण्यात आले. त्यावरुन जिल्ह्याचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. आमदार, खासदारांचे नमुने घेण्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा केला जात असेल तर सामान्यांचे काय? असा प्रश्‍न आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे. त्यावरुनच स्वॅब घेणारे कर्मचारी अप्रशिक्षीत असल्याचे सिद्ध होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान आमदार आणि खासदारांचे घशातील स्त्राव पुन्हा घेत त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या अहवालात दाम्पत्य बाधीत नसल्याचा खुलासा झाला आहे. मात्र ‘कोरोना’ विषाणू नियंत्रणाप्रती प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com