Agriculture news in marathi Politics of dismissal of market committee in Jalgaon | Agrowon

जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची सत्ता असलेल्या बाजार समित्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर मुदतवाढ मिळाली

जळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची सत्ता असलेल्या बाजार समित्यांना मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर मुदतवाढ मिळाली, परंतु, जेथे भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे, तेथे शासनाने थेट बरखास्तीची कारवाई केली. हा दुजाभाव होत असल्याचा मुद्दा आता जिल्ह्यात चर्चिला जात आहे. 

जिल्ह्यात रावेर, यावल, पारोऴा, जळगाव या बाजार समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. या बाजार समित्यांमध्ये दोन्ही काँग्रेस, शिवसेनेच्या मंडळीचे वर्चस्व आहे. रावेर बाजार समितीला मुदतवाढ मिळण्यासाठी रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी पाठपुरावा केला. बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून मुदतवाढीचा प्रस्ताव मार्गी लावण्याची विनंती केली होती. ही विनंती, प्रस्ताव काही दिवसातच मंजूर झाले. 

दरम्यान, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, जामनेर या बाजार समित्यांमध्ये भाजप व समर्थकांची सत्ता आहे. या बाजार समित्या नुकत्याच बरखास्त केल्या आहेत. बाजार समित्यांना मुदतवाढीसाठी जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक, पणन सचिव यांनी शिफारस केली होती. परंतु, यास शासनाने मंजुरी दिली नाही, असा आरोप चाळीसगाव (जि.जळगाव) विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. 

चाळीसगाव बाजार समिती बरखास्त केल्यासंबंधी आपण न्यायालयात दाद मागू, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. जामनेर बाजार समितीत माजी मंत्री गिरीश महाजन व माजी राज्यसभा खासदार ईश्‍वरलाल जैन यांच्या नेतृत्वामध्ये भाजप व मित्रांची सत्ता स्थापन झाली आहे. या बाजार समितीनेदेखील शासनाकडे मुदतवाढीसंबंधी मागणी केली होती. बाजार समिती बरखास्त करून दोन्ही काँग्रेसने राजकारण केल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी केला. 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...