agriculture news in Marathi politics from Jalgaon will be change after Khadse party cahanged Maharashtra | Agrowon

खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय समीकरणे 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधणार आहे. 

जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधणार आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजपचे नेते तथा संकटमोचक अशी बिरूदावली लागलेले गिरीश महाजन यांची जणू पुढे परीक्षाच असणार आहे. खडसेंच्या आगमनामुळे जिल्ह्यात सैरभैर अवस्थेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला काहीशी उभारीदेखील मिळू शकते. 

राजकारणात जातीपातीचा प्रभावही असतोच. अर्थातच जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाज खडसेंचा शब्द मानतो. खडसे यांनी आपल्या समाजातील मंडळीला विविध संस्थांमध्ये नेतृत्व दिले आहे. लेवा पादीटार समाजाची गठ्ठा मते राष्ट्रवादीसोबत पुढे येण्याची शक्यता आहे. या स्थितीत भाजपलादेखील लेवा पाटीदार समाज आपल्या बाजूने कसा राहील, यासाठी लेवा नेतृत्त्वाला प्रोत्साहन द्यावे लागेल. त्याची सुरवात जणू मध्यंतरी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षपद सोपवून भाजपने केली आहे. 

सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खडसे यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर या अध्यक्ष आहेत. तर जिल्हा सहकारी दूध संघात खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष आहेत. या संस्थांमध्ये भाजप समर्थक संचालक अधिक आहेत. परंतु खडसे यांच्या पक्षांतराने या संस्थांचे सत्ताकेंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात येणार आहे. 

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. मध्यंतरी ईश्‍वरलाल जैन व इतर नेते, असा सामना रंगला होता. देवकर व डॉ. पाटील यांच्यातही मतभेद असतात. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या रुपाने कार्यरत आहे. जळगाव महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे फारसे लोकप्रतिनिधी नसल्याने विकासासाठी सत्तेचा उपयोग करण्याचे आव्हानही असणार आहे. 

महाजन-खडसे सामना शक्य 
जळगाव जिल्ह्यात भाजपचा नेता कोण यासाठी खडसे व गिरीश महाजन यांच्यात वर्चस्वाची लढाई अनेकदा व्हायची. महाजन यांनी गेल्या पाच-सात वर्षात जळगाव जिल्हा परिषद, जळगाव महानगर पालिकेसह काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे नेतृत्व केले. शिवाय धुळे, नाशिक येथेही पालिका, जिल्हा परिषदांमध्ये भाजपला यश मिळवून दिले आहे. खडसे पक्षात असताना महाजन जिल्ह्याचे नेतृत्व करीत होते. 

महाजनांची परिक्षा कठीण 
महाजन यांचे दिल्लीच्या सत्तेतील नेत्यांशीदेखील चांगले ट्युनिंग आहे. जुळवून घेणारे नेते म्हणून महाजन यांची ओळख आहे. परंतु खडसे भाजपमधून बाहेर पडल्याने ते पुढे भाजपविषयी आक्रमक होतील. भाजपच्या कमकुवत बाजू खडसे पुढे आणून अडचणी उभ्या करतील. पुढे जिल्हा बँक, दूध संघ व बाजार समित्यांच्या निवडणुका आहे. समर्थक, कार्यकर्त्यांना शक्ती देण्यासाठी या संस्थांमध्ये यश मिळविणे सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहे. या स्थितीत गिरीश महाजन यांची परीक्षा अधिक कठीण होईल, हेदेखील निश्‍चित आहे.


इतर ताज्या घडामोडी
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावाने ६३८५ क्‍...औरंगाबाद : ‘‘किमान आधारभूत किमतीने ६३८५ क्‍...
परतूर तालुक्‍यातील द्राक्ष, डाळिंब...जालना  : परतूर तालुक्‍यातील डाळिंब, द्राक्ष...
खानदेशात गहू पेरणीचा वेग मंदावलाजळगाव : खानदेशात गेली आठ ते १० दिवस ढगाळ वातावरण...