‘टेंभू’च्या निधीवरून रंगला श्रेयवाद

‘टेंभू’च्या निधीवरून रंगला श्रेयवाद
‘टेंभू’च्या निधीवरून रंगला श्रेयवाद

सांगली ः जिल्ह्यातील टेंभू सिंचन योजनेसाठी १२०० कोटींचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. हा निधी मिळाल्याने टेंभू योजना पूर्ण होण्यास गती मिळणार आहे. हा निधी खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून आला, अशी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे टेंभूच्या निधीने राजकीय फड रंगू लागला आहे. जिल्ह्यातील टेंभू योजना पूर्ण व्हावी, त्यातून शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी धडपड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची सातत्याने राहिली आहे. यासाठी निधीची उपलब्धता करण्यासाठी लोकप्रतिनिधींची रस्सीखेच सुरू आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार संजय पाटील हा निधी आणण्यासाठी सातत्याने पुढे येत असल्याचे चित्र आहे. टेंभू योजनेसाठी विट्याचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे मोठे योगदान आहे. वास्तविक पाहता विटा, आटपाडी तालुक्‍यात अनिल बाबर जाऊन या योजनेचे काम कसे सुरू आहे, कुठेपर्यंत काम पूर्ण झाले आहे. याची माहिती घेत असतात. याबाबत टेंभू योजनेच्या कार्यालयात जाऊन सातत्याने पाठपुरावा करताहेत. अशात खासदार पाटील या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतात. निधी मंजुरीचे श्रेय आपोआप भाजपला मिळते. यामुळे विटा, आटपाडी, तालुक्‍यांतील कार्यकर्तेदेखील भाजपचा उदोउदो करू लागले आहे. त्यामुळे शिवसनेचे आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व कमी झाली असल्याचे दिसते आहे. आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आमदार बाबर यांना टेंभूचा निधी आणण्यासाठी भाजपला गळ घालावी लागणार आहे. निधी कोणीही आणा...पण पाणी द्या टेंभू योजनाला १२०० कोटी निधी मिळाला. दोन वर्षांत उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. पण पाणी नाही, पिके वाळू लागली आहेत. पाणी सोडण्याकडे याच नेत्यांचे दुर्लक्ष आहे. पाण्याची मागणीही केली आहे. टेंभूसाठी आणलेला निधी आम्हीच आणला आहे, असे कार्यकर्ते सांगत फिरत आहेत. त्यामुळे निधी कोणीही आणा... पण पाणी द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com