agriculture news in Marathi, politics over credit of tembhu scheme fund in sangli, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘टेंभू’च्या निधीवरून रंगला श्रेयवाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

सांगली ः जिल्ह्यातील टेंभू सिंचन योजनेसाठी १२०० कोटींचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. हा निधी मिळाल्याने टेंभू योजना पूर्ण होण्यास गती मिळणार आहे. हा निधी खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून आला, अशी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे टेंभूच्या निधीने राजकीय फड रंगू लागला आहे.

सांगली ः जिल्ह्यातील टेंभू सिंचन योजनेसाठी १२०० कोटींचा निधी केंद्राने मंजूर केला आहे. हा निधी मिळाल्याने टेंभू योजना पूर्ण होण्यास गती मिळणार आहे. हा निधी खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नातून आला, अशी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे टेंभूच्या निधीने राजकीय फड रंगू लागला आहे.

जिल्ह्यातील टेंभू योजना पूर्ण व्हावी, त्यातून शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळावे, अशी धडपड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची सातत्याने राहिली आहे. यासाठी निधीची उपलब्धता करण्यासाठी लोकप्रतिनिधींची रस्सीखेच सुरू आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार संजय पाटील हा निधी आणण्यासाठी सातत्याने पुढे येत असल्याचे चित्र आहे.

टेंभू योजनेसाठी विट्याचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे मोठे योगदान आहे. वास्तविक पाहता विटा, आटपाडी तालुक्‍यात अनिल बाबर जाऊन या योजनेचे काम कसे सुरू आहे, कुठेपर्यंत काम पूर्ण झाले आहे. याची माहिती घेत असतात. याबाबत टेंभू योजनेच्या कार्यालयात जाऊन सातत्याने पाठपुरावा करताहेत.

अशात खासदार पाटील या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतात. निधी मंजुरीचे श्रेय आपोआप भाजपला मिळते. यामुळे विटा, आटपाडी, तालुक्‍यांतील कार्यकर्तेदेखील भाजपचा उदोउदो करू लागले आहे. त्यामुळे शिवसनेचे आमदार अनिल बाबर यांचे वर्चस्व कमी झाली असल्याचे दिसते आहे. आपले वर्चस्व वाढविण्यासाठी आमदार बाबर यांना टेंभूचा निधी आणण्यासाठी भाजपला गळ घालावी लागणार आहे.

निधी कोणीही आणा...पण पाणी द्या
टेंभू योजनाला १२०० कोटी निधी मिळाला. दोन वर्षांत उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. पण पाणी नाही, पिके वाळू लागली आहेत. पाणी सोडण्याकडे याच नेत्यांचे दुर्लक्ष आहे. पाण्याची मागणीही केली आहे. टेंभूसाठी आणलेला निधी आम्हीच आणला आहे, असे कार्यकर्ते सांगत फिरत आहेत. त्यामुळे निधी कोणीही आणा... पण पाणी द्या, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...