मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राजकीय खडाजंगी 

संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्रही कोरोना संसर्गाचा सामना करत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन राजकीय धुळवड सुरू झाली आहे.
uddhav thakaray
uddhav thakaray

मुंबई: संपूर्ण देशासोबतच महाराष्ट्रही कोरोना संसर्गाचा सामना करत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरुन राजकीय धुळवड सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘राजभवन हे राजकारणाचा अड्डा बनू नये’, अशा शब्दात भाजपला सुनावले असताना भाजप नेते अॅड आशिष शेलार यांनी ‘लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा’ असे प्रत्यूत्तर दिले आहे.  संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे. विरोधी पक्षाला वाटत असेल की असले राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट करुन राज्यपालांवर टीका केली होती. राऊत म्हणाले, कि महाराष्ट्राच्या राजभवनात राज्यपाल अधिकाऱ्यांना परस्पर बोलून यंत्रणा राबवतात. मुख्यमंत्र्यांचे आदेश वेगळे असू शकतात, राज्यपालांचे आदेश वेगळे असू शकतात. त्यामुळे ही कोरोनोसंदर्भात एक गोंधळ निर्माण होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आम्ही नक्कीच बोलणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मुदत २७ मे रोजी संपणार आहे. याबाबत अनेक बातम्या, समज, गैरसमज पसरत आहे. यामुळे प्रशासनामध्ये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे थांबवण्याचे काम राजभवनाचे आहे. या गोंधळाचा केंद्रबिंदू राजभवन आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसे काम करायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभे राहायला पाहिजे.’’  खासदार राऊत पुढे म्हणाले, कि राजकीय फायद्या-तोट्याचे काम कोणी करु नये. राजकारण करु नका असे उद्धव ठाकरे कायम सांगत असतात. सर्वांनी एकत्र यावे ही लोकांचीही भावना आहे. तरीही असे राजकारण होत असेल तर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात काम करत आहेत. अशा लोकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. तसेच कायदेशीरदृष्टया ठाकरे सरकार कोणतीही चूक करणार नाही. याआधी मुख्यमंत्री असे आमदार झाले आहेत याची अनेक उदाहरने आहेत.  यानंतर विरोधकही राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत.  आता लोकशाहीने वागाः आशिष शेलार  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा, असे आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.  भाजपचा पायाच घाणेरड्या राजकारणावरः सचिन सावंत  भाजपचा पायाच मुळी घाणेरड्या राजकारणावर उभा आहे. संपूर्ण जगासोबत महाराष्ट्र कोरोनाचा सामना करत असताना भाजप नेते मात्र सत्तेची स्वप्ने बघत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com