औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत मतदान

औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत मतदान
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत मतदान

औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, जालना मतदारसंघांत मंगळवारी (ता. २३) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान यंत्रात काही ठिकाणी आलेल्या तांत्रिक अडचणी व त्यामुळे काही काळ थांबलेली प्रक्रिया वगळता दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात  61.87 टक्के, तर जालना लोकसभा मतदार संघात 64.5० टक्के मतदान झाले.  जालना जिल्ह्यात 1202958 मतदारांनी केले असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.  2014 च्या निवडणुकीत जालना जिल्ह्यात 66.15 टक्के मतदान झाले होते. 

औरंगाबादेत २३, तर जालन्यात २० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामध्ये भाजपचे राज्य अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे, बहुजन वंचित आघाडीचे इम्तीयाज जलील, डॉ. शरदचंद्र वानखेडे, कॉंग्रेसचे सुभाष झांबड, विलास औताडे, अपक्ष हर्षवर्धन जाधव आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. दोन्ही मतदार संघातील प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी व अपक्षांनी कुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला. 

औरंगाबाद मतदारसंघात १८ लाख ८४ हजार ८६६ मतदारांना मतदानासाठी २ हजार २१ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. या मतदारसंघात मतदानासाठी २ हजार ४४५ कंट्रोल युनिट, ४ हजार ९०३ बॅलेट युनिट, २ हजार ६२२ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आले होते. मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी २२ हजार २०८ अधिकारी कर्मचाऱ्यांची विविध केंद्रावर नियुक्‍ती करण्यात आली होती. 

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ९.०४ टक्‍के तर सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८८ टक्‍के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. दुपारी १ वाजता मतदानाचा टक्‍का २८.७१ टक्‍क्‍यांवर पोहचला होता. दुपारी १ वाजेपर्यंत जवळपास ५ लाख ४१ हजार १४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ५६.३६ टक्‍के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. 

जालना मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या सहा विधानसभा क्षेत्रांत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. १८ लाख ६५ हजार ४६ हजार मतदार या मतदारसंघात आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविणार होते. त्यासाठी २०५८ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. मतदानाची एकूणच प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जवळपास १४ हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. 

सकाळच्या सत्रात पहिल्या दोन तासांत जालना लोकसभा मतदार संघात ९.२४ टक्‍के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजता २३.३२ टक्‍के तर दुपारी १ वाजता मतदानाचा टक्‍का ३७ वर पोहचला होता. जवळपास ७ लाख ३ हजार १०९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. त्यामध्ये ३ लाख ९५ हजार ३५३ पुरूष तर ३ लाख ७ हजार ७५६ महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. दुपारनंतर उन्हाच्या तिव्रतेने मतदानाची गती थोडी संथ झाली होती. लोकसभा मतदार संघात सर्व मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९.३४ टक्‍के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजाविला होता. सुरवातीला मशीन बिघाडीचे काही किरकोळ अपवाद वगळता एकूणच मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com