शिरूर, मावळ मतदारसंघांत उद्या मतदान

शिरूर, मावळ मतदारसंघांत उद्या मतदान
शिरूर, मावळ मतदारसंघांत उद्या मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. शिरूरमध्ये २ हजार ५०४, तर मावळमध्ये २ हजार २९६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. 

शिरूरमधून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात, तर मावळमध्ये युतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे. 

शिरूर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, हडपसर, शिरूर विधानसभा, तर मावळसाठी मावळ, चिंचवड, पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळमधील ४७, तर शिरूरमधील ३१ मतदान केंद्रे संवेदनशील अाहेत. अनुक्रमे १२४ आणि २३० केंद्रांवरून मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण (वेब कास्टिंग) होणार आहे. 

मावळमध्ये २२ लाख ९७ हजार मतदार आहेत. १२ हजार ६५९ कर्मचारी नियुक्त आहेत. शिरूरमध्ये २१ लाख ७३  हजार मतदार आहेत. त्यासाठी १५ हजार ३३१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवी, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक केंद्र महिला कर्मचाऱ्यांमार्फत चालविले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

महिलांमार्फत चालविण्यात येणारी मतदान केंद्रे

मावळ लोकसभा मतदारसंघ  

विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राचे नाव
पनवेल व्ही. के. हायस्कूल, पनवेल.
कर्जत आर.झेड.पी. प्रायमरी मराठी कन्या शाळा, कर्जत
उरण कोकण ज्ञानपीठ कॉलेज, उरण.
मावळ झेड.पी. प्रायमरी स्कूल, कहने.
चिंचवड  यशवंतराव चव्हाण पी.सी.एम.सी. शाळा क्र.६०/१, थेरगाव.
पिंपरी   मनपाचे विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय, पिंपरी.
   

शिरूर लोकसभा मतदारसंघ 

विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राचे नाव
जुन्नर जुन्नर एन.पी.शाळा क्र. १, जुन्नर
आंबेगाव  ८९ न्यू इंग्लिश स्कूल जनता विद्यामंदिर, घोडेगाव.
खेड आळंदी हुतात्मा राजगुरू विद्यालय, राजगुरुनगर.
शिरूर विद्याधाम प्रशाला, शिरूर शहर.
भोसरी माता अमृतानंदमयी विद्यालय, निगडी
हडपसर रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय, माळवाडी, हडपसर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com