वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान 

गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी (ता.१५) वऱ्हाडातील ८९३ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वाधिक ५२७ ग्रामपंचायतींसाठी बुलडाण्यात मतदान झाले.
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान Polling was held for 893 gram panchayats in Varhad
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान Polling was held for 893 gram panchayats in Varhad

अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी (ता.१५) वऱ्हाडातील ८९३ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वाधिक ५२७ ग्रामपंचायतींसाठी बुलडाण्यात मतदान झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ४० टक्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारी मतदान करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. आता सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

अकोल्यात २१४ ग्रामपंचायतींतील  ४४११ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद  अकोला जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींमधील १ हजार ७४१ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. जिल्ह्यातील ४ हजार ४११ उमेदवारांचे भाग्य एकूण ४ लाख ६३ हजार २४७ मतदार ठरविणार आहेत. जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी व्याळा येथील निवडणूक स्थगित झाली तर १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१४ ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक झाली. ८५१ मतदान केंद्रावर मतदान झाले. 

बुलडाण्यात ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक  बुलडाणा जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. यापैकी २८ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. आदिवासी भागातील भिंगारा ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज न आल्याने त्यांची निवडणूक रद्द झाली आहे. एकूण १ हजार ७७५ ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ३ हजार ८९१ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरवात झाली. मतदानासाठी १ हजार ७९५ मतदान केंद्रावर ९ लाख ७० हजार ६१७ मतदारांची व्यवस्था करण्यात आली होती. 

वाशीममध्ये १५२ ग्रामपंचायतीची निवडणूक  वाशीम जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१५) १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी ११ ग्रामपंचायतीमधील २५२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता १५२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ४८६ प्रभागातील १ हजार २३३ जागांसाठी ५३९ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com