प्रदूषण नियंत्रण मंडळच ‘ईपीआर’बाबत संभ्रमात

दुध पिशवी
दुध पिशवी

पुणे: दुधाच्या रिकाम्या पॉलिथिन पिशव्यांचे संकलन आणि पुनर्चक्रण धोरणाबाबत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण स्वतःच संभ्रमात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिलेली मुदत जवळ येऊनदेखील मंडळाने भूमिका स्पष्ट केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.   पर्यावरण मंत्रालयाने २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना काढून ५० मायक्रॉनच्या वरील प्लॅस्टिकचा वापर दूध पिशवीसाठी करण्यास मान्यता दिली. तथापि, त्यात 'ईपीआर'ची अट टाकण्यात आली. ईपीआर (एक्सटेन्डेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलीटी) प्रक्रियेत दूध पिशव्यांचे संकलन व पुनर्चक्रण होते. मात्र, ईपीआर कोणी आणि कसे राबवायचे याबाबत कमालाची संभ्रम आहे. प्रदूषण मंडळ व पर्यावरण मंत्रालयाने देखील ठोस यंत्रणेचा पर्याय दिलेला नाही.  “नव्या प्लॅस्टिक कायद्याचा आधार घेत खासगी व सहकारी दूध संघांच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरू केली होती. पर्यावरण मंत्रालयाने बैठक घेतल्यानंतर मंडळ नरमले. मात्र, ईपीआर समस्येच्या अभ्यास करण्यासाठी समिती तयार करून तीन महिन्यांत तोडगा काढण्याचे या बैठकीत ठरले. पुढील महिन्यात ही मुदत संपुष्टात येईल. परंतु, अद्याप तोडगा निघालेला नाही,” अशी माहिती सहकारी दूध संघांच्या सूत्रांनी दिली. 

प्रदूषण मंडळाने तूर्तास कायदेशीर कारवाई करण्याचे टाळले आहे. तथापि, निवडणुका संपल्यानंतर कारवाई कधीही सुरू करण्याचा पर्यायदेखील खुला ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला दूध पिशव्यांचे संकलन व पुनर्चक्रणाबाबत दूध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी व पुणे महापालिकेच्या आयुक्तांसोबत एक बैठक घेण्यात आली. “पुण्यात दूध पिशव्यांचे ९५ टक्के संकलन होत असल्याचे महापालिकाही सांगते आहे. मात्र, पुनर्चक्रणाच्या प्रक्रियेकडे जाण्यासाठी स्वतंत्र जागा देणे तसेच याठिकाणी यंत्रणा उभारण्याबाबत अद्याप पालिकेने हालचाली केलेल्या नाहीत,” असे डेअरीचालकांचे म्हणणे आहे.  प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका काय आहे...

  • रिकाम्या दूध पिशव्यांचे संकलन होते. संकलित पिशव्या पुन्हा दूध क्षेत्रातच वापरल्या जातात याची खातरजमा केल्याचे शपथपत्र डेअरी उद्योग चालकाने मंडळाला द्यावे.
  • डेअरी उद्योगाला मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या रोलवर ‘फक्त दुधासाठी’ असे छापावे. पिशव्यांचा पुरवठा प्लॅस्टिक कंपनीकडून डेअरीला किती होतो त्याचा तपशील मंडळाला द्यावा.
  • प्लॅस्टिक पिशव्यांची पुनर्खरेदी, पुनर्चक्रण याबाबत कालबद्ध आराखडे मंडळाला सादर करावेत.
  • दूध पिशव्यांचे पुनर्चक्रण न झाल्यास व त्या पुन्हा पर्यावरणात गेल्यास अधिसूचनेनुसार कारवाई केली जाईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com