agriculture news in Marathi poly-house got big setback Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह वाहतुकी अभावी देशांतर्गत तसेच निर्यात बंदीमुळे पॉलीहाऊसधारक फुल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 

पुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह वाहतुकी अभावी देशांतर्गत तसेच निर्यात बंदीमुळे पॉलीहाऊसधारक फुल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील बहुतांश पॉलीहाऊसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे पॉलीहाऊसधारक शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. चक्रीवादळाने अनेक पॉलीहाऊस जमीनदोस्त झाली असून, अनेक पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारपासून जिल्ह्यातील विविध भागात सक्रिय होऊन वादळी पाऊस सुरु झाला. यामध्ये विविध नुकसानीबरोबरच पॉलीहाऊसेसचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्‍ह्यात सर्वात जास्त पॉलीहाऊस मावळ तालुक्यात असून, मावळ तालुक्यासह तळेगाव येथील फ्लोरिकल्चर पार्क मध्ये असे एकूण सुमारे १ हजार २०० एकरवर पॉलीहाऊस आहेत.

तर जिल्ह्यात शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव, तालुक्यांसह भोर, बारामती, इंदापूर, दौंड परिसरात देखील पॉलीहाऊसेस आहेत. बुधवारी आलेल्या चक्रीवादळाने अनेक पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेले आहेत.तर अनेक ठिकाणी पॉलीहाऊस सांगाड्यांसह जमीनदोस्त झाले आहेत. 

याबाबत बोलताना पुणे जिल्हा फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे फुल शेती गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यातच बुधवारी झालेल्या चक्रीवादळाने बहुतांश सर्वच पॉलीहाऊसेसचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कागद फाटणे, संपूर्ण पॉलीहाऊस कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आम्ही आजच संपूर्ण तालुक्यात नुकसानीची पाहणी केली असून, ९० टक्के पॉलीहाऊसेसचे नुकसान झाले आहे. माझे वैयक्तीक ३ कोटींच्या नुकसानीची भिती आहे.’’
 
तळेगाव फ्लोरिक्चर पार्कचे अध्यक्ष मल्हारराव ढोले म्हणाले, ‘‘वादळाने पॉलीहाऊसचे कागद उडून, आतील झाडांचे देखील नुकसान झाले आहे. यानुकसानीच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसात नुकसानीचा आकड्याचा अंदाज येईल.’’ 

असे झाले नुकसान

  • पॉलीहाऊसचे कागद फाटून उडून गेले 
  • अनेक ठिकाणी पॉलीहाऊस सांगाड्यांसह जमीनदोस्त 
  • ९० टक्के पॉलीहाऊसेसचे नुकसानः जिल्हा फुल उत्पादक संघ
  • पॉलीहाऊसमधील झाडांचेही मोठे नुकसान

इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...