agriculture news in marathi, poly houses holders doing agitation for demands, solapur, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पॉलिहाउस- शेडनेटधारकांचे आज राज्यभर धरणे आंदोलन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पॉलिहाउस,शेडनेटमध्ये उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण मिळावे, पीकविमा योजनेत नाशवंत शेतीमालाचा समावेश करावा, शासकीय योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना विनाविलंब अनुदान साह्य मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा.

सोलापूर  ः कर्जमाफीसह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी गेली तीन वर्षे सुरू असलेल्या लढ्याची शासन पातळीवरून अद्याप दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. ९) राज्यभरातील पॉलिहाउस- शेडनेटधारक शेतकरी त्या-त्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पॉलिहाउस- शेडनेटधारक शेतकरी समन्वय समितीतर्फे देण्यात आली आहे.

दुष्काळ, नापिकी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला मिळणारा अल्प भाव यांसारख्या कारणांमुळे गेल्या पाच-सहा वर्षांत राज्यातील पॉलिहाउस-शेडनेटची शेती तोट्यात गेली आहे. तसेच पॉलिहाउस-शेडनेट शेती योजनांच्या अंमलबजावणीतल्या चुकीच्या शासन धोरणांचा या शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नोकरीच्या मागे न लागता आधुनिकतेची कास धरत अनेक उच्चशिक्षित तरुण पॉलिहाउस-शेडनेट शेतीकडे वळाले.

मात्र वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे या तोट्याच्या शेतीतून डोक्यावरील बँक कर्जाचा डोंगर वाढला असून, परिणामी त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. आधुनिक शेती करून आपण मोठी चूक केली अशी त्यांची एकंदरीत भावना झाली असल्याचे समितीने म्हटले आहे.  कृषिमंत्री व राज्यमंत्र्यांनी अडचणीत सापडलेल्या पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. प्रत्येक वेळी आश्वासनांवरच बोळवण केली गेल्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय पॉलिहाउस-शेडनेटधारक शेतकऱ्यांनी घेतला आहे, असे समितीचे सोलापूरचे समन्वयक संजय तळेकर यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...