agriculture news in marathi, polyhouse shednet holder doing agitation for loan waiver, nagar, maharashtra | Agrowon

कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक राज्यव्यापी लढा उभारणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जानेवारी 2019

नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झालेल्या पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या सोमवारी (ता. २१) झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झालेल्या पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांच्या सोमवारी (ता. २१) झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. कृषी विभागामार्फत तरुण शेतकऱ्यांना पॉलिहाउस व शेडनेट उभारण्यासाठी भरीस पाडून कर्जबाजारी केले गेले, मात्र नंतर वाऱ्यावर सोडून दिले गेल्याने राज्यभरातील हजारो तरुण शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. ऐतिहासिक शेतकरी संप व किसान सभेच्या लॉंगमार्चनंतरही या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेले नाही. अशा शेतकऱ्यांवर लाखो रुपयांचे कर्ज असल्याने एकरकमी कर्ज परतफेड योजनेचाही लाभ हे शेतकरी घेऊ शकलेले नाहीत. अशा पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे.

संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची सुरुवात २० फेब्रुवारीला नगर येथे राज्यव्यापी मेळावा घेऊन करण्यात येणार आहे. अकोले येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी नगर, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकसह राज्यातील सर्वच प्रमुख जिल्ह्यांमधून प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रतिनिधींनी आंदोलन व संघटनेच्या समन्वयासाठी राज्य समन्वय समिती गठीत केली. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांच्यासह महेश शेटे, बाळासाहेब दरंदले, सुजाता थिटे, किरण अरगडे, अरविंद कापसे, बाळासाहेब गडाख, शिवाजी नाईक, विजय नाईक, मनोज आहेर, संजय तळेकर, प्रल्हाद बोरसे, विशाल कदम, अण्णासाहेब शिंगवन, शिवाजी तळेकर, गणेश वाघ, दिलीप डेंगळे, राजेंद्र लंगोटे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...