Agriculture news in marathi Pomegranate 150 to 6000 per quintal in the State | Agrowon

राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १५० ते ६००० रुपये दरम्यान

टीम ॲग्रोवन
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ७) डाळिंबांची आवक ३२६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक २५२ क्विंटल झाली. दर ४०० ते ५२५० प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता.

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. ७) डाळिंबांची आवक ३२६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक २५२ क्विंटल झाली. दर ४०० ते ५२५० प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता.

शनिवारी (ता. ४) डाळिंबांची आवक ३०० क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० होता. शुक्रवारी (ता. ३) आवक ३८६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४२५० होता. 

गुरुवारी (ता. २) डाळिंबाची आवक ३०८ क्विंटल झाली. त्यांना ४०० ते ६००० रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४२०० होता. बाजार समितीत डाळिंबाची आवक सर्वसाधारण झाली. गेल्या तीन दिवसात आवक मंदावली असून दर त्यानुसार सर्वसाधारण आहे. बाजारातील आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे दरांत चढ-उतार दिसून आला.

सोलापुरात प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५५०० रुपये 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबांची आवक वाढली. पण, मागणी असल्याने दरही टिकून राहिले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ५५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक रोज एक ते दीड टनापर्यंत होती. त्या आधीही आवकेचे प्रमाण काहीसे असेच आहे. डाळिंबाची आवक सांगोला, मंगळवेढा, माढा आणि मोहोळ या स्थानिक भागांतून झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये असा दर मिळाला.
ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

 या आधीच्या सप्ताहातही डाळिंबाची आवक 
प्रतिदिन एक टनापर्यंत राहिली. दर प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये मिळाला. तर, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही आवक प्रतिदिन ८०० क्विंटल ते १ टनापर्यंत राहिली. प्रतिक्विंटलचा किमान दर ४०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला. किरकोळ चढ-उतार वगळता डाळिंबांचे दर स्थिर  राहिले.

औरंगाबादमध्ये १५० ते ४२०० रुपये

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) डाळिंबाची १२० क्‍विंटल आवक झाली. त्यांना १५० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २८ डिसेंबरला १०९ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांना २५० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० डिसेंबरला ७६ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर ३०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३१ डिसेंबरला ३९ क्‍विंटल आवक झाली. दर ५०० ते ३५०० रुपये दर मिळाला. २ जानेवारीला १२० क्विंटल आवक झाली. दर २०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ जानेवारीला १११ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांना ५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ जानेवारी रोजी आवक ३७ क्‍विंटल, तर दर ३०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ जानेवारीला १३० क्‍विंटल आवक झाली.
ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

सांगलीत १००० ते ६००० हजार रुपये 

सांगली येथील विष्णूअणणा पाटील दुय्यम बाजार आवारात डाळिंबाची गुरुवारी (ता. ९) ५७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते ६००० हजार रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका आणि कर्नाटकातून डाळिंबाची आवक होते. पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी अधिक होत आहे. बुधवारी (ता. ८) २९१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते ६००० रुपये असादर होता. मंगळवारी (ता. ७) ९० क्विंटल  आवक झाली होती. डाळिंबास प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये असा दर मिळाला. 

बाजारात डाळिंबांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुढील सप्ताहात डाळिंबांच्या आवकेत वाढ होऊन, दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

नागपुरात प्रतिक्विंटल ६००० रुपये दर

नागपूर  ः किरकोळ बाजारात अवघ्या ३५ ते ४० रुपये किलो दराने साधारण डाळींब विकले जात आहे. दर्जेदार प्रतीच्या फळासाठी थोडा अधिक दर द्यावा लागत आहे. सध्या बाजारात ६५० ते ७०० क्‍विंटल डाळिंबाची आवक असून १५०० ते ६००० रुपये क्‍विंटलने व्यवहार होत आहेत, असे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

आवक वाढल्याच्या परिणामी कळमणा बाजार समितीत दर गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचेही सांगण्यात आले. डाळिंबांचे सरासरी दर ४८७५ आहेत. कधीकाळी डाळिंबांची पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्यानंतरच्या काळात विदर्भातच डाळिंबांचे लागवड क्षेत्र वाढीस लागले. शेतकरी डाळिंब काढून टाकत आहेत.
ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

परभणीत ३००० ते ४००० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.९) डाळिंबाची ४० क्विंटल आवक झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये सध्या जिल्ह्यातील पंढरपूर भागातून आठवड्यातील गुरुवार आणि शनिवारी डाळिंबाची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी डाळिंबाची सरासरी २५ ते ४० क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी २००० ते ६००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ९) डाळिंबाची ४० क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने झाली, असे व्यापारी महंमद फारुख यांनी सांगितले.

नगरमध्ये एक हजार ते नऊ हजार रुपये दर

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) डाळिंबांची ५२ क्विटंल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते ९००० व सरासरी ५००० हजार रुपयांचा दर मिळाला.

नगर बाजार समितीत आता डाळिंबांची बऱ्यापैकी आवक सुरु झाली आहे. २६ डिसेंबर रोजी ५२ क्विंटलची आवक होऊन १००० ते १०,००० रुपये व सरासरी ५५०० रुपयांचा दर मिळाला. २० डिसेंबर रोजी ४० क्विंटलची आवक होऊन २००० ते १०,००० रुपये व सरासरी ६००० रुपयाचा दर मिळाला. १२ डिसेंबर रोजी  ६५ क्विंटलची आवक झाली. दर १००० ते १५,०००  व सरासरी ६५०० रुपयांचा मिळाला. ५ डिसेंबर रोजी १८ क्विंटलची आवक झाली. दर १००० ते १८,३०० रुपये व सरासरी ८५०० रुपयांचा मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

जळगावात २५०० ते ५२०० रुपये दर

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची गुरुवारी (ता. ९) १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ५२०० रुपयांपर्यंत मिळाले. आवक स्थानिक क्षेत्रासह धुळे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा आदी भागांतून होत आहे. आवक मागील दोन महिन्यांपासून स्थिर आहे. उठाव चांगला असल्याने दर टिकून आहेत. मध्यंतरी आवक वाढली होती. परंतु, आवक मागील २० ते २२ दिवसांत पुन्हा प्रतिदिन २० क्विंटलपेक्षा कमी झाली आहे. 

डाळिंबांची आवक दर (प्रतिक्विंटल, रुपये)

तारीख आवक किमान दर कमाल दर
९ जानेवारी १८ २५००  ५२००
२ जानेवारी १९  २४०० ५०००
२५ डिसेंबर १८  २४०० ५२००
१८ डिसेंबर  २० २२०० ५०००

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली, दरात...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते...परभणी ः  येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५००...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
जळगावात गवार १८०० ते ३८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
कोल्हापुरात गवार दहा किलोस २०० ते ५००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
नगरला ज्वारीच्या आवकेत वाढनगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुण्यात हिरवी मिरची, मटारच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी २५०० ते ३००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...