नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते ८७५० प्रतिक्विंटल

नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते ८७५० प्रतिक्विंटल
नाशिकमध्ये डाळिंब प्रतिक्विंटल ६५० ते ८७५० प्रतिक्विंटल

नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची आवक १४३ क्विंटल झाली. त्यास ६५० ते ८७५० दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  बाजारात वांग्याची ३२१ क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रति क्विंटल २०० ते ८०० असा दर होता. त्यास सरासरी दर ५०० राहिला. फ्लॉवरची आवक ९७४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५७ ते ६४२ दर होता. सरासरी दर ५०० राहिला. कोबीची आवक २९३ क्विंटल झाली. तिला सरासरी २९१ ते ५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ३३३ राहिले. ढोबळी मिरचीची आवक ७९ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ३३७५ दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. पिकॅडोरची आवक ३०९ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० दर होता तर सर्वसाधारण दर १२५० राहिला.  भोपळ्याची आवक ३०५ क्विंटल होती. त्यास २३३ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ६६६ राहिला . कारल्याची आवक ८३ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० असा दर होता. सर्वसाधारण दर २०८३ राहिला. दोडक्याची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ११६६ ते २५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २००० राहिला. गिलक्याची आवक ५९ क्विंटल होती. त्यास ३५० ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर ८३० राहिला.  भेंडीची आवक ७४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २१६५ दर होता. सर्वसाधारण दर १७९० राहिला. गवारची आवक २९ क्विंटल झाली. तिला ३००० ते ५००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला. डांगराची आवक ४७ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १५०० दर होता. सर्वसाधारण दर १२०० राहिला. काकडीची आवक ८९६ क्विंटल झाली. तिला ६००ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर १००० राहिला.  फळांमध्ये खरबुजाची आवक १६० क्विंटल झाली. त्यास त्यास १००० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. मोसंबीची आवक ५१ क्विंटल झाली.तिला १००० ते ३००० दर होता. सर्वसाधारण दर २००० राहिला.संत्रीची आवक ६० क्विंटल झाली.तिला ११०० ते २४०० दर होता. सर्वसाधारण दर १७०० राहिला. काही भाज्या व फळांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ उतार झाल्याचे दिसून आले.  ताज्या बाजारभावासाठी येथे क्लिक करा...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com