डाळिंब बागेत अन्नद्रव्यांचा वापर, कीड,रोग नियंत्रण

सध्याच्या काळात डाळिंब फळांच्या वाढीच्या टप्यानुसार शिफारशीनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.
fertigation through drip irrigation is helpful
fertigation through drip irrigation is helpful

सध्याच्या काळात डाळिंब फळांच्या वाढीच्या टप्यानुसार शिफारशीनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा. प्रतिकूल हवामानामुळे डाळिंब बागेत फळ पोखरणारी अळी, फळमाशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तज्ज्ञांच्या सल्याने उपाययोजना कराव्यात. मृग बहर अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची अवस्था ः फुलधारणा आणि फळांचे सेटिंग

  • सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची फवारणी ः १ ते १.५ किलो प्रति हेक्टरी करावी.
  • विद्राव्य एन.पी.के ००:५२:३४(मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) ८.५ किलो प्रती हेक्टर प्रती वेळ - ठिबक सिंचनाद्वारे ७ दिवसांच्या अंतराने असे तीनवेळा द्यावे.
  • जिप्सम १.७० ते १.८० किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ७०० ग्रॅम प्रती झाड जमिनीतून द्यावे. त्यानंतर पाणी द्यावे. ठिबक प्रणालीद्वारे मॅग्नेशिअम सल्फेट देता येते.
  • विद्राव्य एन.पी.के. ००:५२:३४(मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट) ८.५० किलो, युरिया २२.५० किलो आणि ००:००:५० हे खत १६.३० किलो प्रति हेक्टर प्रती वेळ ठिबकद्वारे ७ दिवसांच्या अंतराने ५ वेळा द्यावे.
  • १ ते १.५ किलो प्रती हेक्टर प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाची फवारणी करावी.
  • ५० पीपीएम प्रमाणे जिबरेलीक ॲसिडच्या १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  • कीड व्यवस्थापन  फळ पोखरणारी अळी ( फवारणी- प्रती लिटर पाणी) अंडी अवस्था 

  • निम तेल १ टक्के किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३.५ मिलि अधिक ०.२५ मिलि स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • करंज बियांचे तेल ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • अॅझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मिलि अधिक करंज बियांचे तेल ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि.
  • अळी अवस्था किंवा फळांवरील छिद्र दिसत असल्यास

  • सर्व सछिद्र फळे काढून एका खड्ड्यात गाडून नष्ट करावीत.
  • सायॲण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.७५ मिलि अधिक स्प्रेडर स्टीकर ०.२५ मिलि.
  • हस्त बहर  ताण तोडण्याच्या अवस्थेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन 

  • शेणखत २५ ते ३० किलो प्रती झाड किंवा शेणखत १५ ते २० किलो अधिक गांडूळखत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रती झाड जमिनीतून द्यावी किंवा चांगले कुजलेले कोंबडीखत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रती झाड द्यावे.
  • जिप्सम २.५ ते २.८ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ८०० ग्रॅम प्रती झाड जमिनीमध्ये मिसळून द्यावे.
  • जैविक फॉर्मूलेशन अॅझोस्पिरिलम, अॅस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हीरिडी आणि पेनिसिलियम पीनोफिलम प्रत्येकी १० ते २० ग्रॅम प्रती झाड याप्रमाणे सावलीत कुजलेल्या शेणखतासोबत मिसळून द्यावे. मिश्रणात ६० टक्के ओलावा राखावा. १५ दिवस उलथापालथ करावे. नंतर झाडांना द्यावे.
  • आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी, (ए एम एफ ग्लोमाज स्पेसीज) १० ते १५ ग्रॅम प्रती झाड द्यावे.
  • खते दिल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे.
  • कीड व्यवस्थापन- (फवारणीः प्रती लिटर पाणी)  पहिल्या सिंचनानंतर निळे किंवा पिवळे चिकट सापळे १५ ते ३० प्रति एकरी याप्रमाणे झाडाच्या उंचीच्या १० ते १५ सेंमी खाली बांधावेत. ते कीटकांद्वारे सापळ्याच्या व्यापलेल्या पृष्ठभागाच्या आधारे किंवा २०-२५ दिवसांचा अंतराने बदलत राहावे. कोवळी फूट वाढीची अवस्था

  • कडूनिंब तेल १ टक्के किंवा अॅझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा करंज बियांचे तेल ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • अॅझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) ३ मिलि अधिक करंज बियांचे तेल ३ मिलि प्रति लिटर स्टिकर स्प्रेडरसह फवारणी करावी.
  • फूल कळी / फुलधारणा अवस्था 

  • पहिल्या फवारणीनंतर ७-१० दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
  • सायंअॅन्ट्रानिलीप्रोल ०.७५ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ % ईसी) ०.७५ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा
  • फ्लुबेन्डीअमाइड (१९.९२ % डब्ल्यू डब्ल्यू )अधिक थायाक्लोप्रिड (१९.९२ % डब्ल्यू डब्ल्यू) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि फवारावे.
  • सूत्रकृमी प्रादुर्भावित क्षेत्र पहिल्या सिंचनाच्या वेळी फ्ल्युन्सल्फोन (२% दाणेदार) ४० ग्रॅम प्रति झाड प्रमाणे ठिबक खाली ५-१० सें.मी. खोल खड्ड्यात किंवा २ वर्षांपेक्षा मोठ्या झाडांसाठी ४० ग्रॅम प्रति ४ ते ५ लिटर पाण्यात विरघळवून झाडाभोवती गोलाकार ड्रेंचिंग करून घ्यावे. (टीप- वरील सर्व शिफारशी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी केलेल्या आहेत.) संपर्क- दिनकर चौधरी, ०२१७-२३५००७४ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com