डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही स्थिर

डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही स्थिर
डाळिंबाची आवक घटली, मागणी नसल्याने दरही स्थिर

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक १७३० क्विंटल झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवक घटली असून, परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर आहेत. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४५० ते ४००० व मृदुला वाणास ५०० ते ६७५० प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  चालू सप्ताहामध्ये कांद्याची आवक १०८०५ क्विंटल झाली. त्यास बाजारभाव १२०० ते ४००० प्रतिक्विंटल होते. आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली. बटाट्याची  १०७०५ क्विंटल आवक झाली. बाजारभाव १३०० ते १९०० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक २४१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९००० ते १६००० होते. आर्द्रकची आवक १२८ क्विंटल झाली. त्यास ३००० ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ६५ ते १६०, वांगी १२० ते ३००, फ्लॉवर ४५ ते ११० असे प्रति १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ४५ ते ७५ असा प्रति २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची १३० ते २२५ असा प्रति ९ किलोस दर मिळाला. भोपळा ४५  ते १८०, कारले २०० ते ४००, गिलके ५० ते १५०, भेंडी १५० ते २५० असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ६८० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १०५० प्रतिक्विंटल मिळाला. मोसंबीची आवक ३०३ क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. बोराची आवक ५२४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते २००० दर मिळाला. टरबुजाची आवक ३७० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १८०० दर मिळाला. खरबुजाची आवक २०८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २५०० दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com