agriculture news in marathi Pomegranate arrivals in Nashik are normal; Rate fixed | Agrowon

नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबांची आवक ९६१७ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३०० ते ३७५० दर मिळाला.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबांची आवक ९६१७ क्विंटल झाली. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ३०० ते ३७५० दर मिळाला. सरासरी २५०० व मृदुला वाणास ३०० ते ९०००, तर सरासरी ५७५० रुपये दर मिळाला. सध्या आवक सर्वसाधारण असून दरही स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक सर्वसाधारण आहे. आवक ३८६६ क्विंटल झाली. प्रतिक्विंटल १९५० ते ४८००, तर सरासरी दर ४०५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५६५४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते ३१५०, तर सरासरी दर २८०० रुपये राहिला. लसणाची आवक २९४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६५०० ते १४०००, तर सरासरी दर १०५०० रुपये राहिला.

फळभाज्यांची आवक कमी राहिली. दरात तेजी कायम आहे. वालपापडी-घेवड्याची आवक ३७६९ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३००० ते ५५००, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ४००० ते ६०००, तर सरासरी दर ५००० रुपये राहिला.

वाटाण्याची आवक गत सप्ताहात अवघी २७ क्विंटल झाली. दरात तेजी राहिली. प्रतिक्विंटल ६००० ते ११०००, सरासरी दर ९००० रुपये मिळाला. गाजराची आवक २५६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३६००, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. टोमॅटोला २८० ते ६०१, तर सरासरी ४००, वांगी ३०० ते ६००, तर सरासरी ४०० व फ्लॉवर १४० ते ५७५ सरासरी ४६० रुपये दर प्रति १४ किलोस मिळाले.

कोबीला १२३ ते ५१०, तर सरासरी ३७५ रुपये दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ५०० ते ८००, तर सरासरी दर ६०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक १८४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १०००, तर सरासरी दर ७५० रुपये मिळाला. पपईची आवक १३० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १९००, तर सरासरी दर १३०० रुपये होता.

मोसंबीची आवक ८६० क्विंटल झाली. तीला १८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी दर ३००० रुपये मिळाला. शहाळ्यांची आवक ५८२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० तर सरासरी दर ३००० रुपये राहिला.


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...